DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PM Poshan Shakti Nirman Shalaparasbag

PM Poshan Shakti Nirman Yojana Shalaparas bag gr

Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana Shala Paras bag
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी समिती गठित करण्याबाबत.....
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२४
वाचा:-
१) शाळांमध्ये परसबागांबाबत (School Nutrition Gardens) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.१५ ऑक्टोंबर, २०१९.
२) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.२१ डिसेंबर, २०२२.
३) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शापोआ-२०१८/प्र.क्र. १७१/एसडी-३ दि. ११ जुलै, २०२३.
४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शापोआ-२०१८/प्र.क्र. १७१/एसडी-३ दि. ०५ सप्टेंबर, २०२३
प्रस्तावना:-
केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम सर्व शाळांस्तरावर राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येतात. विद्याथ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होणे, कृषि विषयाचे पायाभूत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे, ताज्या भाजीपालाचा समावेश विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात होणे, विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर करण्यास मदत होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.
शासन निर्णय क्रमांकः शापोआा-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३
नागरी भागातील शाळांमध्ये कमी जागेमध्येही विविध पर्यायाद्वारे परसबाग निर्मिती करण्याबाबत शासन परिपत्रक दि.११ जुलै, २०२३ अन्वये मागदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यातील नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणे व सदर परसबागांमध्ये लागवड करण्यात येणारा भाजीपाला व त्यांचा आहारात समावेश करणे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खालीलप्रमाणे समित्या गठित करण्यात येत आहे.
अ) मुंबई (कोकण विभाग) :-

क) अमरावती आणि नागपूर या विभागासाठी गठित करण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष श्री. विष्णू मनोहर, सुप्रसिध्द शेफ हे राहतील तसेच अमरावती विभागासाठी

शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, अमरावती व नागपूर विभागासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, नागपूर हे सदस्य सचिव राहतील.

ड) नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी गठित करण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल कामत हे राहतील. तसेच, नाशिक विभागासाठी गठित समितीचे सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर हे समितीचे सदस्य सचिव राहतील.

इ) विभागीय समितीमध्ये तीन सदस्य निवडीचे अधिकार संबंधित विभागीय समितीच्या अध्यक्षांना राहतील.

२. सदर विभागनिहाय समितींची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहिल.

i. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणे

ii. शाळांमधील उपलब्ध जागा विचारात घेवून नविन तंत्रज्ञानापासून परसबागांची निर्मिती करण्याबाबत व परसबागांमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा भाजीपाला यांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करणे.

iii. परसबागेमध्ये उत्पादित भाजीपाला व त्याचे पोषणमूल्य याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपाययोजना सूचवणे.

iv. परसबागेमध्ये उत्पादित भाजीपाला यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये करण्याबाबत नागरी भागातील शाळांना मार्गदर्शन करणे.

V. विद्यार्थ्यांनी पोषण आहाराचा लाभ घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना सुचविणे. जेणेकरुन शाळा स्तरावर Zero Waste ही संकल्पना राबविता येईल.

३. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या स्पर्श करा या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०२२७१४५९५२२५२१ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( तुषार महाजन )

उप सनचव, महाराष्ट्र शासन

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon