DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rajya Jilha Vibhagstar Yuvamhotsav GR


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

E-mail id: sd4.sesd-mh@gov.in

दुरध्वनी क्र. २२०२४७४५

क्रमांक :- संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ०५/एस.डी.४

तात्काळ

दिनांक: ०४ जानेवारी, २०२३

प्रति,

१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषयः- २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील सहभागासाठी My Bharat Portal वर नोंदणी करण्याबाबत.

महोदय,

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे दि.१२ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सदर महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती, लोककला या विषयाची नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर महोत्सवात युवांचा मोठया प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा व महाविद्यालयांची तसेच शाळा व महाविद्यालयातील विदयार्थ्यांची नोंदणी My Bharat Portal वर करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितांना देण्यात याव्यात.

२. सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ, महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम,

चर्चासत्रे, प्रदर्शने, खेळ इ. कार्यक्रमाच्या थेट प्रेक्षपणाची सुविधा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व

शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा व महाविद्यालयांतील विदयार्थ्यांना महोत्सवाचे थेट

प्रेक्षपण पाहता येईल याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व

शाळा/महाविद्यालयांना कळविण्यात यावे ३. सदर युवा महोत्सवात राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची अधिकाधिक नोंदणी My Bharat Portal वर करण्यात यावी व नोंदणीचा नियमित आढावा घेऊन आकडेवारी शासनस्तरावर सादर करण्यात यावी, ही विनंती.

आपली,
(मृणाली काटेंगे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
👇👇👇👇👇👇
राज्य, विभाग व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
शासन निर्णय क्रमांक : युकयो-२४२३/प्र.क्र.४८/क्रीयुसे-३ 
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ०३२४०० 
दिनांक : २६ डिसेंबर, २०२३

वाचा :
१) शासन निर्णय क्रमांक : युकयो-२०११/प्र.क्र.४३/क्रीयुसे-३, दिनांक १४.०६.२०१२
२) शासन निर्णय, क्रमांक युकयो-२०१२/प्र.क्र.६७/क्रीयुसे-३, दिनांक ०६.०१.२०१४
३) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे पत्र क्र.क्रीयुसे/ युवा महोत्सव २०२३-२४ का.१०/३४२३, दिनांक ०६,१०.२०२३
४) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे पत्र क्र. क्रीयुसे/युवा /महोत्सव २०२३-२४ का. १०/४३८५, दिनांक १८.१२.२०२३

प्रस्तावना :
महाराष्ट्र राज्यातील १३ ते ३५ वयोगटातील युवा लोकसंख्येचा विचार करता देशाच्या युवा धोरणाच्या अनुषंगाने राज्याचे स्वतंत्र युवा धोरण तयार करुन त्याद्वारे युवक कल्याणाच्या विविध योजना राबविण्यासाठी राज्याचे युवा धोरण २०१२ शासन निर्णय दिनांक १४ जून, २०१२ अन्वये जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत १९९४ पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राज्यामध्ये आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्यामध्ये युवा महोत्सवाचे आयोजन प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राज्याचा प्रतिनिधी संघ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यासाठी स्तरनिहाय अनुदान देऊन राज्यातील युवांना युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. युवा महोत्सव आयोजित करण्याकरीता दि.०६/०१/२०१४ च्या शासन निर्णयान्वये अनुदान मर्यादा निश्चित केली आहे. युवा महोत्सवाचे बदलेले स्वरूप वाढलेली महागाई, मजूरी तसचे जी.एस.टी/टि.डी.एस. या बाबी तसेच युवांना युवा महोत्सवाकरीता आकर्षित करण्यासाठी संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या अनुदान मर्यादेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. युवा महोत्सवाचे आयोजन करण्याकरीता संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या अनुदान मर्यादेमध्ये वाढ करण्याची, युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील प्राविण्य धारकांना रोख पारितोषिक देण्याच्या बाबीचा नव्यानेच समावेश करणे, सन २०२३-२४ या वर्षाच्या राज्य युवा महोत्सवाचे ठिकाण निश्चित करण्याचे आणि त्याकरीता निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय क्रमांकः युकयो-२४२३/प्र.क्र.४८/क्रीयुसे-३
शासन निर्णय :
युवा महोत्सवामध्ये युवा सहयोगाची वयोमर्यादा आणि इतर अटी व शर्ती दरवर्षी केंद्र शासन निर्धारित करेल त्या ग्राह्य धरण्यात येतील.
२. राज्य, विभाग व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन व राष्ट्रीय स्तरावर सहभागासाठी स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक बाबींसाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठीच्या खर्चास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे :-

३. युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी युवा महोत्सवातील जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील प्राविण्य धारकांना परिशिष्ट -अ" मध्ये नमूद केल्यानुसार रोख पारितोषिक देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ४. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलेले असल्याने सन २०२३ - २४ च्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पादनात विज्ञानाचे महत्त्व तसेच सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना केंद्र शासनाने दिली आहे. या संकल्पनेवर आधारित युवा महोत्सवात जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवाची व्यापकता व संकल्पना विचारात घेता, "परिशिष्ट- ब नुसार जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. राष्ट्रीय युवा महोत्सव व त्यामधील संकल्पना विचारात घेऊन प्रतिवर्षी समितीची रचना करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता आवश्यकतेनुसार समिती गठीत करण्याचे अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात येत आहेत.

६. राज्यात युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक प्रकारात करण्यात येवून जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे. स्पर्धात्मक बाबींच्या जिल्हा स्तरावर स्पर्धा घेवून अस्पर्धात्मक बाबींसाठी जिल्हा व विभागाचे प्रातिनिधिक पथक सहभागी होईल. अस्पर्धात्मक बाबींमध्ये प्रदर्शन, चर्चासत्र, नवीन संकल्पना- संशोधनाबाबत माहिती, परिसंवाद, प्रक्रीया उद्योगातून रोजगार व्यवसाय, भौगोलिक परिस्थिती अनुरुप संकल्पना, या क्षेत्रातील यशोगाथा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

७. सन २०२३-२४ च्या राज्य युवा महोत्सवाचे आयोजन डिसेंबर, २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात लातूर येथे करण्यास व त्याकरीता रू.४७७.४७ लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

८. सदरचा खर्च मागणी क्र. ई- ३,२२०४ क्रीडा व युवक सेवा १०३ विद्यार्थीत्तर युवक कल्याण कार्यक्रम (१०) युवक कल्याण ग्रामीण भाग, (१२) युवा धोरणातंर्गत योजना, युवा महोत्सवाचे आयोजन, ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२०४ ५५८२) या लेखाशिर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा. याकरिता आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे हे नियत्रंक अधिकारी राहतील. जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ अनुक्रमे क्र.३१०/१४७१,

दि.२६/१०/२०२३ व क्र. वित्त विभाग, शिकाना, नागपूर- ३९२ /व्यय-५, दि. १५.१२.२०२३ अन्वये

निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या CLICK HERE या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२६१७३१०४३७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

परिशिष्ट-अ

युवा महोत्सवातील प्राविण्य धारकांसाठी राज्यस्तरावर रोख पारितोषिक देण्यासाठी मंजूर रक्कम

युवा महोत्सवातील प्राविण्य धारकांसाठी विभागीय / जिल्हास्तरावर रोख पारितोषिक देण्यासाठी मंजूर रक्कम







Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon