DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Vistar Adhikari sudharit vetan star GR

 Vistar Adhikari sudharit vetan star GR




राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी यांना लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, 

शासन निर्णय क्रमांक जिपअ-२०२३/प्र.क्र.३६७ /आस्था-४ दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२३.

फोर्ट, मुंबई - ४०० ००१

वाचा:-

१. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: वेपूर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि. १३ फेब्रुवारी, २०२३.

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या खंड-२ मधील शिफारशीं संदर्भात निर्णय घेतले आहेत. राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करुन ज्या संवर्गाना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.

उपरोक्त शासन निर्णयामधील विवरणपत्र- अ मध्ये लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी या संवर्गाच्या वेतनस्तरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये उपरोक्त संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाही आणि लागू करावयाचे असल्यास ग्राम विकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करतो. त्यामुळे संदर्भ क्र. १ चा शासन निर्णयामधील सुधारित वेतनस्तर राज्यातील जिल्हा परिषदमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी या संवर्गांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय प्रसृत करण्यात येत आहे.

शासन निर्णय:-

वित्त विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक: वेपूर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि. १३ फेब्रुवारी, २०२३ मधील सुधारित वेतनस्तर (विवरणपत्र -अ) राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी या संवर्गांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे.

२. उपरोक्त सुधारित वेतनस्तर लागू करताना संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त संवर्गांना लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. ३८४ / सेवा-९, दि.३०.१०.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

विवरणपत्र - अ

राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात येत आहेत अशा संवर्गांची माहिती दर्शविणारे विवरणपत्र.

शा.नि.

मधील

अ.क्र.

३६

३७

संवर्गाचे नाव

७ व्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतनस्तर (रु.)

वेतनस्तर (रु.)

लघुलेखक (उच्चश्रेणी)

लघुलेखक (निम्नश्रेणी)

एस-१५ : ४१८००-१३२३००

एस-१४ : ३८६००- १२२८००

एस-१६: ४४९००-१४२४००

एस-१५ : ४१८००-१३२३००

९९

विस्तार अधिकारी

एस-१३ : ३५४००-११२४००

समितीने शिफारस केलेला ७ व्य

वेतन आयोगातील सुधारित

एस-१४ : ३८६००- १२२८००

राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत.

DOWNLOAD GR PDF COPY


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon