महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे
क्रमांक : शिसंमा-२०२४/ग्रंथ, उन्नयन सुधारणा/६१०/टो-४/२५१
दिनांक : ११.०१.२०२४. 12 JAN 2024
प्रति, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
विषय : राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत.
संदर्भ
: १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१८/प्र.क्र.२४३ /टीएनटी-२, दि.१३ एप्रिल, २०२३.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१८/प्र.क्र.२४३ /टीएनटी-२, दि.०७ नोव्हेंबर, २०२४.
उपरोक्त विषयावरील संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयानुसार अर्धवेळ ग्रंथपालाचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नयनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर उन्नयन करतांना शासनाने अ.क्र.१ ते ९ अटी घालून दिल्या होत्या. आता शासनाच्या संदर्भ क्र.२ वरील निर्णयान्वये शासन निर्णय दि.१३.४.२०२३ मधील अट क्र.५ वगळण्यात आली असून, त्याऐवजी अटी व शतींची पूर्तता करणा-या पात्र ग्रंचपालाची समान वेतन टप्यावर वेतननिश्चिती करण्यात यावी व त्यांना दि.१२.८.१९९६ च्या शासन निर्णयानुसार वेतन व फायदे देण्यात यावेत. तथापि, सदरहू ग्रंथपालांना दि.१३.४.२०२३ रोजीचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून वेतन व लाभ अनुज्ञेय राहतील. अशी सुधारित अट समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच दि.१३.४.२०२३ च्या शासन निर्णयातील अट क्र.२ च्या पूर्ततेच्या अनुषंगाने पात्र ग्रंथपालांना त्यांनी यापूर्वी केलेल्या सेवेवाचत एकूण सेवा वर्ष कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित शाळेने/संस्थेने देणे बंधनकारक असेल.
तरी उपरोक्त दोन्ही शासन निर्णयातील तरतूदीस अनुसरुन आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात येऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावा.
संपत सुर्यवंशी शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
या संबंधीचा शासन निर्णय वाचा किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा
हेही वाचाल
राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक. एसएसएन-२०१८/प्र.क्र.२४३/१८/टिएनटी-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
दिनांक:- ०७ नोव्हेंबर, २०२३
वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२६९६/३१७४४ (६९१/९६) मशि-२. दि. १२ ऑगस्ट, १९९६. ४/अ. ग्रं. उ/२०२२/२०१० दि.२४.०२.२०२२. •४/अ. ग्रं. उ व स./ २०२२/३६८२, दि.०१.०६.२०२२. ६) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१८/प्र.क्र.२४३/१८/ टीएनटी-२, दि. १३ एप्रिल, २०२३.
२) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-१७०२/९/२००२) मशि-२, दि.०३ ऑगस्ट, २००६. ३) शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१८/प्र.क्र.२४३/१८/टीएनटी-२, दि.०१ सप्टेंबर, २०१८.
४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. शिक्षकेतर/टि-
५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. शिक्षकेतर / टि-
प्रस्तावना :- राज्यातील कार्यरत असलेल्या सर्व अर्धवेळ ग्रंथपालांचे राज्यातील उपलब्ध असलेल्या २११८ पूर्णवेळ ग्रंथपाल पदांच्या मर्यादेत शासनास संदर्भाधीन क्र.५ अन्वये प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे दोन व तीन शाळा एकत्रित करुन शाळा मॅपिंग अहवालानुसार १००१ विद्यार्थी संख्येचा निकष पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्नयन (रूपांतरण) करण्यास तसेच, या कार्यवाहीनंतर शिल्लक राहिलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांचे टप्याटप्याने पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रुपांतरण) करण्यास अटी व शर्तीच्या आधारे शासन निर्णय दि.१३.०४.२०२३ अन्वये मान्यता दिली आहे. सदर शासन निर्णयातील अट क्र. ५ नुसार किमान वेतन टप्यावर उन्नयन (रुपांतरण) करताना सेवाजेष्ठ अर्धवेळ ग्रंथपाल त्यांना वाढीव कार्यभारानुसार आर्थिक लाभ मिळत नसल्याने सदर शासन निर्णयातील अटींमध्ये सुधारणा करण्याबाबत डॉ. बाबासाहेव आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनास विनंती करण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयातील अटीनुसार दीर्घकाळ अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सेवा कालावधी पुर्ण केलेले सेवाजेष्ठ अर्धवेळ ग्रंथपालांचे किमान टप्यानुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रुपांतरण) होताना वाढीव कार्यभारानुसार त्यांना आर्थिक लाभ मिळत नसल्याचे तसेच, अट क्र.२ च्या पुर्ततेच्या अनुषंगाने संबंधित ग्रंथपालांना यापूर्वी केलेल्या एकूण सेवेबाबत संबंधित शाळा/संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यास अडचणी येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्याअनुषंगाने दि.१३.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील अटीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
शासन निर्णय दि.१३.०४.२०२३ मधील अट क्र.५ वगळण्यात येत असून, त्याऐवजी "अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र ग्रंथपालांची समान वेतन टप्यावर वेतननिश्चिती करण्यात यावी व त्यांना दि.१२.०८.१९९६ च्या शासन निर्णयानुसार वेतन व फायदे देण्यात यावेत. तथापि, सदरहू ग्रंथपालांना दि.१३.०४.२०२३ रोजीचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून वेतन व लाभ अनुज्ञेय राहतील.” अशी सुधारित अट समाविष्ट करण्यात येत आहे..
२. दि.१३.०४.२०२३ च्या शासन निर्णयातील अट क्र. २ च्या पुर्ततेच्या अनुषंगाने पात्र ग्रंथपालांना त्यांनी यापूर्वी केलेल्या सेवेबाबत एकूण सेवा वर्षे कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित शाळेने/संस्थेने देणे बंधनकारक असेल.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयाचा संकेतांक २०२३११०७१७२५५९६३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
DOWNLOAD GR PDF COPY
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon