Pradhanmantri Vishwakarma Kaushaly Yojna
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
Pradhanmantri Vishwakarma Kaushaly Sanman Yojna
विविध अवजारे व साधनांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या परंपरागत कौशल्य असलेल्या कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत शासनाकडून आर्थिक मदत व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेत विविध १८ पारंपरिक कामांचा समावेश आहे. योजनेंतर्गत सुतार, लाकडी होडी (नाव) तयार करणारे, कुलूप तयार व दुरुस्त करणारे, टूलकीट तयार करणारे, सोनार कारागीर, कुंभार, मूर्तिकार, गवंडी काम करणारे मिस्त्री, चर्मकार, चटई व झाडू तयार करणारे, पारंपरिक बाहुल्या, खेळणी तयार करणारे, नाव्ही, धोबी, फुलांच्या माळा बनविणारे, मासे पकडण्याच्या जाळ्या तयार करणारे, अवजारे बनविणारे, शिलाई काम करणारे शिंपी आणि लोहार यांचा समावेश आहे. या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज पहिल्या टप्प्यात आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे. व्यवसायासाठी केवळ ५ टक्के व्याजदराने हे कर्ज मिळणार आहे.
Also Read हेही वाचाल
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान
योजनेत १८ प्रकारचे प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना दररोज ५०० रुपये विद्यावेतन
दिले जाणार आहे,
तसेच पी.एम. विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र
दिले जाणार आहे. सोबतच १५ हजार रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल
व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी जिल्हा ग्रामोद्योग
अधिकाच्यांशी संपर्क साधावा
Pradhanmantri Vishwakarma Kaushaly Yojna
पात्रतेचे निकष
कारागीर व्यक्ती हा भारताचा नागरिक
असावा.
योजनेत समाविष्ट १८ व्यवसायापैकी
कोणत्याही एकाशी संबंध असणे आवश्यक आहे.
कारागीर व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा
जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित
ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
योजनेत समाविष्ट १४० जातींपैकी कोणत्याही एका जातीचा कारागीर व्यक्ती असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागीर व्यक्तीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँकचे पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे.
अशी करा नोंदणी
योजनेचा लाभ घेण्यासाठी
या अधिकृत संकेतस्थळावरील अप्लाय
ऑनलाईन लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड संबंधित
व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे आल्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून भरावा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व कागदपत्रे स्कॅन
करून अपलोड करावी.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon