DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Navbharat Sakshrta Karykram GR

Navbharat Sakshrta Karykram GR

   NILP 
NEW INDIA LITERACY POLICY 
 राज्यामध्ये नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे व त्यानुसार राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर विविध समित्यांची संरचना करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र २ अन्वये मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेची बैठक दि. १८/०४/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या शासन इतिवृत्त दि. ११/०५/२०२३ अन्वये विविध मुद्यांनुसार नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची कार्यवाही करणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याअनुषंगाने संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये सर्व क्षेत्रीय कार्यालयांना योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. जनगणना कार्यालयाकडून निरक्षर (असाक्षर) व्यक्तींची जिल्हानिहाय / तालुका निहाय/ गावनिहाय संख्या उपलब्ध करुन देण्यात आली परंतु नावनिहाय माहिती उपलब्ध न झाल्याने निरक्षरांचे (असाक्षरांचे) प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे क्रमप्राप्त होते. सदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दि. १७/०८/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ या कालावधीत शालाबाहय विद्यार्थ्याच्या सर्वेक्षणासोबत निरक्षर (असाक्षर) व्यक्तीचेही सर्वेक्षण संबंधित शिक्षकांमार्फत करणेबाबत कळविण्यात आलेले होते. संदर्भ क्र.५ अन्वये सर्वेक्षणाद्वारे प्राप्त होणारी निरक्षर (असाक्षर) व्यक्तींची माहिती गुगल लिंकवर भरणेबाबत संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले होते. परंतू शिक्षक संघटनांनी सर्वेक्षण कामकाजावर बहिष्कार टाकल्याने कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

राज्यातील विविध प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे निवेदनाद्वारे या कार्यालयास कळविण्यात आले होते. सदर सर्व संघटनांच्या अध्यक्ष / पदाधिकारी यांना स्वतंत्र पत्राद्वारे बहिष्कारापासून परावृत्त होऊन नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी व सर्वेक्षणासाठी सहकार्य करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. याबाबत संदर्भीय पत्र क्र. ६ व ९ अन्वये राज्य शासनास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणेची सद्यस्थिती कळविण्यात आलेली आहे. या कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्र. ७ अन्वये नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन राज्यामध्ये सुरु करण्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचित करण्यात आले होते. काही क्षेत्रीय कार्यालयाने साक्षरता वर्ग अल्पप्रमाणात सूरु झाल्याबाबत कळविलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत राज्यामध्ये निरक्षरांचे (असाक्षरांचे) सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने अध्ययन-अध्यापन उद्दिष्टानुसार सूरु होऊ शकलेले नाही.

सर्व परिस्थितीचा विचार करुन या कार्यालयस्तरावर राज्यातील विविध प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांच्या अध्यक्ष/सचिव व इतर पदाधिकारी यांची प्रत्यक्ष बैठक दि. २५/०९/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये बहिष्काराच्या अनुषंगाने प्रशासनाचे अधिकारी व संघटना पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा व विचारविनिमय कhरण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत एकदा ऑफलाईन सर्वेक्षण केल्यानंतर पुढील कालावधीत पुन्हा सर्वेक्षण करावे लागणार नाही हे संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले होते. परंतु उपस्थित सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी सदर योजनेच्या कामकाजावर सर्वानुमते बहिष्कार कायम असल्याचे कळविले आहे. तसेच राज्यामध्ये सद्यस्थितीत SCERT, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत सुरु असलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांवर देखील विविध शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येणे शक्य झालेले नाही.

संदर्भीय पत्र क्र.८ अन्वये शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयामार्फत उल्लास- नव भारत साक्षरता योजनेंतर्गत दि. १६/१०/२०२३ व दि.१७/१०/२०२३ या कालावधीत सर्व विभाग व जिल्हास्तरावरील अधिकारी यांची राज्यस्तरीय कार्यशाळा मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, संचालक, SCERT, शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), संचालक (बालभारती) व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये SCERT, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मान्यवरांनी राज्यामध्ये नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या निर्देशानुसार आपणास खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.

१. मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण यांनी केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम हा संपूर्णत: शैक्षणिक असल्याचे नमूद केले आहे. शिक्षकांना त्यापासून वेगळे होऊन चालणार नाही शिक्षण हे फक्त विद्यार्थ्यांना शिकविणे इथपर्यंत मर्यादित असू शकत नाही. सदरचा कार्यक्रम देशातील इतर राज्यांमध्ये यशस्वी होत असेल तर महाराष्ट्रात का नाही ? याचा विचार करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने शिक्षकांचे समाजातील मानाचे स्थान पाहूनच या कार्यक्रमासाठी शाळा हे एकक ठरविलेले असल्याचे कळविले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.

२. शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना नव भारत साक्षरता कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यांनी सदर योजनेंतर्गत निरक्षरांचे (असाक्षरांचे) सर्वेक्षण, स्वयंसेवकांचे सर्वेक्षण, अध्ययन-अध्यापन व इतर कामकाजासाठी महाविद्यालयीन / शालेय विद्यार्थी, एन.एस.एस/ एन.सी.सी./ स्काऊट गाईड विद्यार्थी, शिक्षक, समुदाय, गृहिणी, अंगणवाडी सेविका, बचत गट, पंचायत राज संस्था व इतर स्वयंसेवी संस्था इ. यांचा सहभाग घेऊन कार्यक्रमाची अंमलबजावणी व तद्अनुषंगिक कामकाज तात्काळ सुरु करावे.

Download circular pdf





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon