DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Justice Mahadev Govind Ranade न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृतिदिन

Justice Mahadev Govind Ranade


न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृतिदिन
जन्म - १८ जानेवारी १८४२ (निफाड,नाशिक)
स्मृती - १६ जानेवारी १९०१ (पुणे)
    न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड, नाशिक येथे झाला. त्यांची निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद अशी ओळख होती. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर अनेक देशव्यापी चळवळींच्या मुळाशी त्यांची प्रेरणा होती. अनेक चळवळींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे.
    ‘मराठे शाहीचा उदय व उत्कर्ष’ या विषयावर चिकित्सक अभ्यास करणारे न्या. रानडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या सार्वजनिक कार्याला, त्यातील चळवळींना गती तर दिलीच पण एका उच्च स्तरावर राहून या चळवळींना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला.
    या सर्व चळवळींचा रथ पुढे नेतांना त्यांनी समाजाला आधुनिक जगाची ओळख करून दिली. विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रूजवायचा प्रयत्न केला. तसेच बालविवाह आणि जातीयता या समाज विघातक रूढींविरोधी जागृती निर्माण करण्याचं कार्य न्या. रानडे आपल्या चळवळींद्वारे करीत असत. ‘राईज ऑफ मराठा पॉवर’ Rise of Maratha Power हे त्यांचे इंग्रजी पुस्तक विशेष गाजले. ‘एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स’ Essays on Indian Economics हे एका अर्थतज्ज्ञाने लिहिलेले उत्कृष्ट पुस्तक म्हणून लोकप्रिय झाले. महादेव गोविद रानडे हे जसे निःस्पृह न्यायाधीश म्हणून मान्यता पावलेले होते तसेच ते अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत. ‘हिमालयाप्रमाणे भव्य आणि उत्तुंग’ असे महात्मा गांधींनी त्यांचे वर्णन केले होते. विनम्र अभिवादन !

1➤ महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कुठे झाला होता ?

=> १८ जानेवारी १८४२ (निफाड,नाशिक)

2➤ महादेव गोविंद रानडे या टोपन नावाने ओळखले जात

=> न्यायमुर्ती रानडे

3➤ ........................ येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

=> पुणे

4➤ इ. स.मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवडले गेले.

=> मुंबई

5➤ पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली ............. विद्यापीठात झाली

=> मुंबई

6➤ महादेव गोविंद रानडे यांचा पहिला विवाह केव्हा व कोणत्या वर्षी झाला ?

=> वयाच्या ११|१२ व्या वर्षी १८५१

7➤ न्यायमुर्ती रानडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईत कोणत्या समाजाची स्थापना केली ?

=> प्रार्थना समाज

8➤ समाजसुधारकांच्या प्रश्नांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन कोणत्या परिषदेची स्थापना केली ?

=> भारतीय सामाजिक परिषदेची

9➤ ............. असे महात्मा गांधींनी म. गो. रानडे वर्णन केले होते.

=> ‘हिमालयाप्रमाणे भव्य आणि उत्तुंग’

10➤ महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू केंव्हा आणि कुठे झाला ?

=> १६ जानेवारी १९०१ (पुणे)
00
 'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण'  या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join Our What's App Group
 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon