DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

National Energy conservation Day

National Energy conservation Day

💡 १४ डिसेंबर 💡
*जागतिक उर्जा संवर्धन दिन*
***************************
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

National Energy conservation Day Quiz 
राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन : प्रश्नमंजुषा लेखाच्या शेवटी आहे ती नक्की सोडवा 
 !!!ऊर्जा वाचवू  या आपला आणि देशाचा विकास करू या.!!!
आज जागतिक उर्जा संवर्धन दिन ! 
    भारतात दरवर्षी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. सन १९९१ पासून ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस हिरवेगार आणि उज्वल भविष्य घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याने ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
    १४ डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही बहुतेक करुन लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोता पासून निर्माण होते. ज्या इंधनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली त्याच ६० टक्के भाग आपण गेल्या २०० वर्षातच खर्च केला आहे. आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते.शिवाय अशाप्रकारे होणारया ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे.
     इ स १८६० पेक्षा आजचे जागतिक तापमान जवळ पास ०.७५ अंशाने वाढले आहे. ते ह्या शतकाच्या शेवटी ६ अंशानी वाढण्याची शक्यता आहे.ह्या सर्वान्वर ऊर्जा संवर्धन हा एकच उपाय आहे.ऊर्जा संवर्धन म्हणजे परिणामात फरक न करता ऊर्जेचा न्याय्य उपयोग आणि ऊर्जेच्या वापराचे प्रमाण कमी करणे. ऊर्ज वाचवणे हे ऊर्ज निर्माण करण्यापेक्षा खूप सोपे आणि बिनखर्चाचे आहे. त्याचे काहि उपाय खालिलपैकी आहेत.
१) तुम्हाला काम नसेल तेव्हा तुमचा पीसी /  लैपटोप शट डाऊन करा. तसेच गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे आनि इतर विजेची उपकरणे बन्द ठेवा.
२)तुमच्या एसी चे टेम्परेचर  सेटिन्गज २५ अंशान्वर ठेवा.
३) औफिसला जाताना कार पूलीन्ग चा उपयोग करा.
४) सी एफल दिव्यांचा उपयोग करा.आपण आपल्या दैनन्दिन आयुष्यात वीज आणि ऊर्जा वाचवून आपला आणि देशाचा विकास करू या.
    जवळ्पास सगळ्या ठिकाणी. घरगूती वापर, दुकान,उद्योग, शेती, वाह्तूक हया सर्व क्षेत्रान्मध्ये ऊर्जा वाचवीता येइल. ऊर्ज बचतीचे अनेक उपाय Buerau of Energy Efficiency च्या तसेच इतरही साइट्सवर दिलेले आहेत. भारतात सध्या ऊर्जेचा एकूण तुटवडा ८ टक्के आहे . हाच तुटवडा कमाल मागणीच्या काळात (Peak Demand) १३ टक्क्यान्वर जातो. ट्यमुळे आपल्याला भारनियमनाला (Load Shedding) तोन्ड द्यवे लागते. तर एका अन्दाजानुसार , वरील सर्व क्षेत्र मिळून, २० टक्के वीज वाचवीता येइल. हे आपण केले तर भारनियमन करावेच लागणार नाही.
सध्या सुचलेले आणखी काही उपाय:
१. फ्रिजमधून एकदम गॅस (का गैस?) वर किंवा गॅसवरुन फ्रिजमधे असं करु नका. पदार्थ रूम टेंपरेचर(मराठी शब्द?)ला आल्यावर मग गॅसवर किंवा फ्रिजमधे ठेवा.
२. मायक्रोवेव्ह अव्हनमधे पदार्थ गरम करण्यापेक्षा गॅस वापरा.
३. लाद्या पुसण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, इ. वापरलेलं पाणी संडास फ्लश करण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे पाण्याची बचत होईलच, शिवाय ते पाणी वरच्या टाकीत चढवण्यासाठी लागणारी वीजही वाचेल.
४. लिफ्टऐवजी शक्यतो जिनेच वापरा. शरीरासाठीही ते चांगलंच.
५. साध्या बल्ब आणि ट्यूब्जच्याऐवजी सी.एफ.एल. किंवा एल.ई.डी.वाले दिवे वापरा.
    ऊर्जासंवर्धन ऊर्जा संवर्धन करणे खूपच सोपे असून ऊर्जेचा वापर गरजेपुरता करून ऊर्जेची बचत करता येते. यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नैसर्गिक वायूविजन, हवा याचा वापर करावा. ऊर्जा संवर्धन ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही करता येते.
    भारत सरकारने ऊर्जा बचत विधेयक २००१ ला मंजूर केले. त्या पद्धतीने ऊर्जा संवर्धन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्याला आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे सूचित केले. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर ऊर्जा संवर्धनासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रानेही राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ जाहीर केले असून पुढील पाच वर्षांमध्ये १००० मेगावॉट ऊर्जेची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवून यासाठी स्वतंत्र धोरण राबविण्यात आले आहे.
    सध्या भारताची विद्युत निर्मितीची क्षमता ३३१ गेगावॉट इतकी असून महाराष्ट्र राज्याची १३.८२ गेगावॉट इतकी आहे. यापैकी ६३ टक्के वीज निर्मिती औष्णिक (प्रामुख्याने कोळसा) पद्धतीने होत असल्याने हरितगृह वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. ह्याचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खनिज इंधनाचे साठे मर्यादित असल्याने व त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यात त्याची टंचाई निर्माण होऊ शकते. 
    या सर्वांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपलब्ध खनिज इंधनाचा वापर अधिक काटकसरीने, कार्यक्षमतेने करणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाने ऊर्जा बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन ऊर्जा संवर्धन कायदा २००१ मंजूर केला आहे. बीईई, नवी दिल्ली यांच्या अभ्यासानुसार विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनासाठी वाव आहे.पथदिवे व पाणीपुरवठा  २०, घरगुती क्षेत्र  २०, व्यावसायिक क्षेत्र  ३०, उद्योग क्षेत्र  २५, कृषी क्षेत्र  ३० टक्के इतकी वीज संवर्धनासाठी वाव आहे.
    महाऊर्जाने केलेल्या परीक्षणानुसार महाराष्ट्रात अंदाजे ३७०० मेगावॉट वीज उत्पादन क्षमता वाढ वाचविणे शक्‍य आहे. तसेच कोळसा, खनिजतेल गॅस या खनिज इंधनाच्या वापरापैकी २० टक्‍के ते ३० टक्‍के इंधन वाचविणे शक्‍य आहे.
    आपण वर्षाला किती कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जन करतो व त्यामुळे किती हरितगृह वायूचे उत्सर्जन होते, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. तसेच इंधनाच्या वापराने सल्फर ऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साईडचे उत्सर्जन होते. या सर्वांमुळे आम्ल वर्षा होते. याचा परिणाम तळे, नदी, जमीन, झाडेझुडपे, प्राणी, त्वचा व डोक्‍याचे विकार तसेच इमारतीवरही होतो. ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षम साहित्याचा जास्तीतजास्त उपयोग करणे, तसेच अपारंपरिक स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन : प्रश्नमंजुषा 
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन : प्रश्नमंजुषा 
CLICK HERE 

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

 इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
उर्जा मंत्रालय भारत सरकार द्व्रारा आयोजित 
उर्जा संवर्धन २०२२ चित्रकला स्पर्धा
राज्यस्तरीय पारितोषिक याप्रमाणे : प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 30 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये  तर उत्तेजनार्थ 7 हजार 500 रुपये.  राष्ट्रीय स्तरीय पारितोषिक याप्रमाणे : प्रथम  1 लक्ष रुपये, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 30 हजार रुपये  तर उत्तेजनार्थ 15 हजार रुपये. उर्जा विकास अभिकरण विभागाचा उपक्रम उर्जा संवर्धन जनजागृतीकरीता चित्रकला स्पर्धा या स्पर्धेबाबत च्या नियम, अटी शर्तीची सविस्तर माहितीसाठी 
  CLICK HERE   वर टिचकी मारा 

राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन : प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon