Bal Shahid ShirishKumar
हुतात्मा शिरीष कुमार
जन्म - २८ डिसेंबर १९२६ (नंदुरबार)
स्मृती - ९ सप्टेंबर १९४२ (नंदुरबार)
साक्षात मृत्यूवरही विजय मिळवून अमर झालेला हुतात्मा म्हणजे बालवीर शिरीषकुमार यांचा जन्म नंदुरबार येथे झाला. महात्माजींच्या चले जाव आंदोलनाचे वारे देशभर पसरले. जन आंदोलनाचा सागर उसळला ‘भारत ठायी ठायी व्यक्ती व्यक्ती पेटली बेचाळीस क्रांतीलागी दिव्य शक्ती भेटली’ असा तो काळ. गावोगाव तिरंगा ध्वज हाती घेऊन, ब्रिटिशांची पर्वा न करता प्रभात फेऱ्या निघत होत्या.बलिदानाची आण घेऊन स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी लक्षवधी जनता त्यात सहभागी होत होती. मोठ्यांचं अनुकरण छोटेही करत होते. ‘आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला?’ असं म्हणत क्रांतिपर्वात सामील होत होते. अशीच एक मिरवणूक निघाली ९ सप्टेंबर १९४२ रोजी नंदुरबार येथे. तिच्या अग्रभागी होते हाती तिरंगा घेतलेले शशिधर नीलकंठ केतकर, लालदास शहा, घनश्याम शहा, धनसुखलाल वाणी आणि शिरीषकुमार.
‘वंदे मातरम’ चा जयघोष करणाऱ्या त्या युवकांना ब्रिटिश पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखविला. पण, त्याची फिकीर या युवकांनी केली नाही. अखेर गोळी सुटली आणि तिने अवघ्या सोळा वर्षाच्या शिरीषकुमारांच्या छातीचा वेध घेतला. ‘सोलून अंग केला झेंडा स्वतंत्रतेचा’ असे म्हणत शिरीषकुमारने हौतात्म्य पत्करले. आपल्या उष्णोष्ण रक्ताचा अभिषेक मायभूमीला घातला.
हुतात्मा शिरीष कुमार यांना विनम्र अभिवादन !
हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला आपले सामान्य ज्ञान तपासा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा
Solve MCQ Multiple Choice Question highlighting the life work of Martyr Shirish Kumar Mehta and enhance your knowledge Test your general knowledge Questions useful for all types of competitive exams
CLICK HERE 

२➤ बालशहीद शिरीषकुमार मेहता यांचा जन्म कुठे झाला होता ?
=> नंदुरबार
३➤ शिरीषकुमार मेहता यांच्या मातापित्याचे नाव काय होते ?
=> पुष्पेंद्र व सविता
४➤ नंदनगरी म्हणजेच नंदुरबार शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
=> पाताळगंगा
५➤ नंदुरबार च्या प्रभात फेरीत शिरीषकुमार ने आपल्या मातृभाषेतून कोणती घोषणा दिली होती ?
=> नही नमशे, नही नमशे
६➤ महात्मा गांधीनी 'चले जाव' चा आदेश केव्हा दिला ?
=> ९ ऑगस्ट १९४२
७➤ नंदुरबारच्या प्रभात फेरीत सहभागी झालेले शिरीषकुमार कोणत्या इयत्तेत शिकत होते ?
=> इ. ८ वी
८➤ शहीद शिरीषकुमार यांच्या वर कोणाचा प्रभाव होता ?
=> महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस
९➤ श्रीमंत व समृद्ध नगरी म्हणून नंदुरबारचे वर्णन कोणत्या प्रवाशाने केले होते ?
=> ट्वेनियर
१०➤ नंदनगरी म्हणजेच नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख काय म्हणून होती ?
=> सुवर्णनगरी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon