DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Graduate Voter Online Registration

Graduate Voter Online Registration


 पदवीधर मतदार संघ निवडणूक 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या मतदारसंघाची मतदार यादी डाउनलोड करायची आहे का?येथे क्लीक करा👇


पदवीधर / शिक्षक मतदान यादी मध्ये नाव शोधण्या साठी येथे क्लीक करा👇


 पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये मतदाराने मतदान करताना घ्यावयाची दक्षता 

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणूकीचे मतदान दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत होणार आहे. यासाठी मतदान करतेवेळी भारत निवडणूक आयोगाने नमूद केलेले निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना यापैकी कोणतेही ओळखपत्र सोबत बाळगावे. 
    मतदाराने मतपत्रिकेवर मत नोंदविण्यासाठी केवळ मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या पेनाचाच वापर करावा. स्वत:जवळील पेनचा वापर करु नये. मतदानासाठी पसंतीक्रम देण्यासाठी रोमन, इंग्रजी किंवा देवनागरी लिपीतील अंकांचाच वापर करावा. मतदानाचा पसंतीक्रम नोंदवितांना रोमन, इंग्रजी आणि देवनागरी लिपीतील अंक सरमिसळ करुन एकत्रित नोंदवू नये. एकाच लिपीतील अंक नोंदवावे. मत नोंदविताना कोणत्याही उमेदवारासमोर प्रथम प्राधान्य एक क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. प्राधान्यक्रम एक क्रमांकानंतर इतर पसंतीक्रम नोंदविणे मतदाराला ऐच्छिक आहे. प्रथम प्राधान्य ‘एक क्रमांक’ केवळ एकाच उमेदवारासमोर नोंदविणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त उमेदवारासमोर एक पसंतीक्रम नोंदवू नये. तसेच एकाच उमेदवाराच्या नावासमोर एक क्रमांक आणि त्याच उमेदवाराच्या नावासमोर दोन, तीन, चार असे पसंतीक्रम नोंदवू नये. 
    त्याशिवाय मतपत्रिकेमध्ये उमेदवाराच्या नावासमोर चूक किंवा बरोबर असे चिन्ह नोंदवू नये. मतपत्रिकेवर रोमन, इंग्रजी आणि देवनागरी लिपीतील अंक सोडून इतर कुठलेही चिन्ह नोंदवू नये. पसंतीक्रम अक्षरामध्ये नोंदवू नये. तसेच पसंतीक्रमाची पुनरावृत्ती करु नये. पसंतीक्रम दिलेल्या चौकटीबाहेर जाऊ देऊ नये. दोन उमेदवारांना एक हा पसंतीक्रम नोंदवू नये. अशा प्रकारे मतदान करताना मतदारांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, विभागीय आयुक्त यांनी केले आहे. 

 हे ही वाचा 👇 

पदवीधर मतदार नोंदणी आता घरबसल्या करा  
Graduate Voter Registration 
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन कशी करावी?
पदवीधर मतदार आता ऑनलाईन नोंदणी करू शकता  
Graduate voters can now register online

Election Commission of India
Latest Update Events Elections Notifications Press Release 
Important Note Regarding Applicant Documents 
1) Applicant address proof should be self attested by applicant.  
2) Applicant should upload the graduate degree certificate / Marksheet or requisite document which is duly authenticated by the Designated Officer / Additional Designated Officer / Gazetted Officer of the district concern / notery public.  
3) Concern ERO will verify the authenticity of uploaded document by field verification.  
4) Applicants photo should be passport size colour photo.
अर्जदाराच्या कागदपत्रांबाबत महत्त्वाची सूचना
१) अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेला असावा.
२) अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र / मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करावे जे पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी / जिल्हा संबंधित / नोटरी पब्लिकच्या राजपत्रित अधिकारी यांनी योग्यरित्या प्रमाणि४त केले आहेत.
३) कन्सर्न ईआरओ अपलोड केलेल्या दस्तऐवजाची सत्यता फील्ड व्हेरिफिकेशनद्वारे सत्यापित करेल.
) अर्जदारांचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा.
Online Graduate Form 18
ऑनलाइन ग्रॅज्युएट फॉर्म 18

 
Online Graduate From 18 
Check Name and form Status
नाव आणि फॉर्मची स्थिती तपासा
Online facility for enrollment for Nashik and Amravati Graduate Constituencies 
नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी नावनोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon