DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Dr Ram Manohar Lohia स्वातंत्र्य सेनानी व भारतीय राजनेता डॉ. राम मनोहर लोहिया

 Dr Ram Manohar Lohia 

स्वातंत्र्य सेनानी व भारतीय राजनेता  डॉ. राम मनोहर लोहिया : प्रश्नमंजुषा 
Indian Political Thinker -  Dr. Ram Manohar Lohia  Quiz

नेते राम मनोहर लोहिया
जन्म - २३ मार्च १९१० (अकबरपूर,UP)
स्मृती - १२ ऑक्टोबर १९६७ (नवी दिल्ली)
    समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत राम मनोहर लोहिया यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्य पर्वातील आघाडीचा कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या राम मनोहर लोहिया यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिन मधून पीएचडी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.
    १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलना दरम्यान आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. १९५५ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९६३ पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले. 
राम मनोहर लोहिया यांचे १२ ऑक्टोबर १९६७ रोजी निधन झाले.
राम मनोहर लोहिया यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा व आपल्या ज्ञानात भर घाला सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon