DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

International Day of Democracy Quiz जागतीक लोकशाही दिवस प्रश्न मंजुषा

 जागतीक लोकशाही दिवस 

International Day of Democracy
September 15 is celebrated as the International Day of Democracy across globe after being established in 2007 through a resolution passed by the United Nations General Assembly (UNGA).
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) संमत केलेल्या ठरावाद्वारे 2007 मध्ये स्थापना झाल्यानंतर 15 सप्टेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो.
सन २००७ सालच्या राष्ट्रकूलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली होती. त्यामागे, एक पार्श्वभूमी होती. 
    फनिर्नंड माकोर्स या फिलीपिन मधल्या हुकूमशहाची २० वर्षांची सत्ता तिथल्या जनशक्ती क्रांतीदलाने उलथवून लावली, तेव्हा तिथल्या नव्या राष्टाध्यक्ष कोसाझोन अक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली १९८८ साली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. अस्तित्वात असलेल्या व नव्याने उदयास आलेल्या प्रजासत्ताक राज्याच्या तत्त्वपूर्ण नियमावलीची प्रतिष्ठना करणे हा या परिषदेचा हेतू होता. 
    या परिषदेच्या कतार, दोहा येथे भरलेल्या सभेत लोकशाहीच्या हितार्थ राष्ट्रकुलाने पुढाकार घ्यावा याचा पुनरुच्चार झाला. पुढे १९९७ च्या सप्टेंबर मध्ये आंतर लोकसभा संघटनेने लोकशाही मूल्याचा उद्घोष केला नि राष्ट्रकूलाला जागतिक लोकशाही दिन जाहीर करावा लागला.
    लोकशाही हे एक सार्वत्रिक मूल्य आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होते व तो सार्वजनिक बंधने पाळीत मुक्तपणे आपले जीवन जगू शकतो. आपल्या हक्काची मागणी करीत असताना, नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले तर लोकशाही अखिल मानवतेला हितकारक ठरते.
लोकसत्ताक राज्याला इंग्रजीत 'डेमोक्रसी' हा प्रतिशब्द आहे व तो ग्रीक शब्द 'डेमोज' म्हणजे लोकं आणि 'क्रेटीन' म्हणजे राज्य करणे, यावरून अप्रभ्रंशित झाला आहे. 
    लोकांनीच राज्य करण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीकांनी सुरू केली होती. समानता आणि स्वातंत्र्याद्वारे सार्वजनिक जीवनात शांती पसरावी हा लोकशाहीचा हेतू असतो. त्यामुळे, सार्वजनिक कामकाजात नागरिकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार लाभलेला असतो. 
    मानवी हक्क अबाधित राखून, त्याचे संवर्धन करणे हे लोकशाहीचा मुख्य हेतू असतो. त्यासाठी लोकांना नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते. लिंग, जात, धर्म या सर्वापेक्षाही मानवता महान हेच लोकशाहीचे सूत्र असते. 
    महिलांच्या सहभागाने तर लोकशाहीची शान वाढते. परंतु, लोकसंख्येत अर्धा वाटा असूनही जगातल्या लोकसभांत त्यांचा सहभाग अल्पसा आहे. तो वाढावा म्हणून देखील आजच्या दिवसाची जागृती आहे. 
    प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे हा आजच्या दिवसाचा हेतू साध्य झाला तरच, अब्राहम लिंकन यांनी म्हटल्या प्रमाणे 'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, हे खरे ठरेल.
सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीसाठी व सर्व इयतांच्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा 
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा
Click the Link Below 

 Quiz on International Day of Democracy Quiz 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon