





Let's Be Snake Friends Quiz
snake knowledge
Snake Quiz
चला बनू सर्पमित्र : प्रश्नमंजुषा
सापांबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत, त्या पुढीलप्रमाणे :
साप दूध पितो.
साप पुंगीच्या तालावर डोलतो
सापांना सुगंधाची आवड असते. तो केवड्याच्या बनात राहतो.
साप ‘डूक’ धरतो, त्याला चिडविणार्या किंवा त्रास देणार्या व्यक्तीचा बदला घेतो.
साप काही वर्षांनी मानवी अवतार घेतात.
साप चावला असता उलटा होतो. त्यामुळे विष शरीरात जाते.
धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते
जुनाट सापांच्या शरीरावर केस असतात.
साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.
सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते.
नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.
हरणटोळ सर्प माणसाच्या डोक्यावर उडी मारून टाळू खातो.
अजगर माणसाला गिळतो.
गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात.
गरोदर स्त्रीने सापाला पाहिल्यास जन्मणारे मुलास जीभ चाटण्याची सवय लागते.
वापरलेले सॅनेटरी नॅपकीन जर सापाने खाल्लं तर गर्भ धरत नाही.
साप पकडणार्यांकडे मंत्र असतो.
सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो. या अशा अनेक अंधश्रद्धा सर्रास बोलल्या जातात.
सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी (प्रथमोपचार)
रुग्णास कोणत्याही प्रकारची हालचाल करू देऊ नका.
दंश झालेल्या ठिकाणी रुमालाने, दोरीने ३/४ रुंदीचे कापड किंवा शक्य झाल्यास ‘क्रेप बॅन्डेज’ने बोट किंवा पेन राहील, अशा अंतराने मध्यम दाब देत बांधावे.
दंश झालेला भाग जंतुनाशकाच्या सहाय्याने स्वच्छ करावा.
कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने जखम कापू नये/खराब करू नये.
मानसिक संतुलनही स्थिर ठेवावे, जास्त चिंताजनक वातावरण करू नये.
रुग्णास काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
विनाविलंब दवाखान्यात घेऊन जावे.
सर्पदंशामुळे मनुष्य मृत्युमुखी पडण्याची प्रमुख कारणे
दंशाच्या ठिकाणाहून दवाखान्यापर्यंत पोचायला केलेला विलंब
रुग्णामध्ये भीती निर्माण होणे.
चुकीचे प्रथमोपचार – नस/शीर कापून घेणे.
रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी असणे.
रुग्णाच्या शरीरात विषाची मात्रा जास्त जाणे.
Click the below link and solve Quiz
खालिल वर टिचकी मारा आणि प्रश्न मंजुषा सोडवा
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon