DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

९ ऑगस्ट १९४२ ऑगस्ट क्रांती दिन : प्रश्नमंजुषा August Revolution Day Kranti Din Quiz

 ९ ऑगस्ट १९४२ ''ऑगस्ट क्रांती दिन'' : प्रश्नमंजुषा 


  "August Revolution Day"  

प्रश्न मंजुषा या लेखाच्या शेवटी आहे 
निबंध, भाषण या साठी उपयुक्त लेख व प्रश्न मंजुषा 
क्रांती दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवाआणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व 
सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा 

९ ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन'' तमाम क्रांतिवीरांना अभिवादन
    'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्टअर्थात क्रांती दिन! 
स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवसपण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित आहे.
दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती
    क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर संमत केला
    ०७ ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर क्रांती मैदान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते
    आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला गांधीच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानाला सिद्ध होण्याची स्फूर्तीदायक   आवाहन केले 
    सामुदायिक चळवळ न करता एकएका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते
    महाराष्ट्राची भोर आष्टी आवली महाड गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबाल वृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले
    नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीषकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली वंदे मातरम च्या घोषणा दिल्या पोलिसांनी छोट्या मुला वर गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार लालदास धनसुख लाल  शशिधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले
    1942 च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे आले त्यामध्ये जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया छोटूभाई पुराणिक अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली विश्वात मेहरअली सुचिता कृपलानी एस एम जोशी शिरुभाऊ लिमये नागोरे संतोष चव्हाण वसंतदादा पाटील लाल बागडी उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते
    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता नागपूरच्या जनरल आवारे यांची लाल सेना मुंबईला विठ्ठल जवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले त्याला आझाद रेडीओ म्हणत 
    देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तिथे लोकाभिमुख सरकारी स्थापन केली याला प्रतिसरकार असे म्हणतात महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 आली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले
    कुंडल येथील क्रांती अग्रणी जी डी उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकार मार्फत केली जात
    साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे ही म्हटले जाते

On August 8, 1942, #Gandhiji told the crowd gathered at the Gowalia Tank Maidan in Bombay, "Let every Indian consider himself to be a free man." With the echo of 'Karo ya Maro' or 'Do or Die', he launched the #QuitIndia Movement or the Bharat Chhodo Andolan. His fiery speech touched the core of every Indian present at the venue that day. It gave the nation the final push to dive deeper into the freedom struggle & not rest till the British quit India and made it an independent nation 

  प्रश्न मंजुषा  सोडविण्यासाठी 


#AmritMahotsav 
#IconsOfIndependence
#MainBharatHoon 
#ActionsAt75 
#IdeasAt75
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon