जागतिक लोकसंख्या दिना निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
११ जुलै
जागतिक लोकसंख्या दिवस
झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्या विषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे. आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १९५० साली जगाची लोकसंख्या २५० कोटी होती. ११ जुलै १९७८ साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली. तेव्हापासून ११ जुलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते. देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात १३५ कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनला देखील भारत मागे टाकण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.
World Population Day Quiz
World Population Day 2021 वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रत्येकानं योगदान दिले पाहिजे. लोकसंख्येमुळे आपल्या संपूर्ण जीवन शैलीवरही परिणाम होत आहेत
World Population Day 2021 वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रत्येकानं योगदान दिले पाहिजे. लोकसंख्येमुळे आपल्या संपूर्ण जीवन शैलीवरही परिणाम होत आहेत
प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला
जातो. वाढती लोकसंख्या (World Population Day 2020) नियंत्रणात ठेवण्यासाठी
प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने
हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न मंजुषा सोडविण्या साठी खालिल CLICK HERE वर टिचकी मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon