DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२३ National Science Seminar-2023

 अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२३  
  
  National Science Seminar 2023  

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था)

नागपूर - ४४०००१.

विषय : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२३ (National Science Seminar-2023)

संदर्भ : NO. RSCN/11014/NSS/2023 / 01 DATE 18 July, 2023

उपरोक्त विषयाकिंत संदर्भीयपत्राचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२३ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेला आहे. त्यानुसार आपल्या जिल्हयातील शासनमान्य सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना कळवून प्रत्येक शासन मान्य शाळेतील इयत्ता ८ वी १० वी पर्यंतचे विद्यार्थी या विज्ञानविषयक उपक्रमात सहभाग घेतील या बाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. प्रत्येक तालुक्यातून तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करणेबाबत आवश्यक पाठपुरावा करावा. जिल्हास्तरावरील स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विहित कालमर्यादेत विभागस्तरावर आयोजन करण्यात यावे. या उपक्रमास प्राधान्य देऊन आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरीत या कार्यालयास सादर करावा.

मार्गदर्शक सूचना :- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक र्कायकारणभाव समजून विश्लेषणात्मक विचाराची जागृती करणे. स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दिंगत करुन भाषा वैज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रदानाची संधी उपलब्ध करुन देणे, देशात विखुरलेल्या प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकत्ता दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात National Science Seminar) आयोजन करत असते

या वर्षी विज्ञान मेळाव्याचा विषय पुढीलप्रमाण आहे :- (National Science Seminar-2023)

अ) इंग्रजी: Millets A Super Food or a Diet Fad ? -

ब) हिंदी : श्री अन्न एक मूल्यवर्धित पौष्टिक अथवा भ्रांती आहार

क) मराठी :- भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम.

स्पर्धेचे नियम व अटी पत्रात नमुद केलेल्या आहेत.

            या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२३ ला नॅशनल सायन्स सेंटर, ऑडीटोरियम हॉल प्रगती मैदान, नवी दिल्ली ११०००१ येथे करण्यात आलेले असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी विज्ञान मेळावयाचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात यावे.

१. प्रथम प्रत्येक शाळास्तरावर यास्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. एक उत्कृष्ट विद्यार्थी तालुकास्तरावर पाठवावा.

२. तालुकास्तरावर दिनांक ०१/०८/२०२३ ते ०७/०८/२०२३ दरम्यान एक दिवसाची स्पर्धा आयोजीत करुन

प्रत्येक तालुका पातळीवरील गुणनुक्रमे येणा-या दोन विद्यार्थ्याची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात

यावी. जिल्हास्तरावरील एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्हयाचे शिक्षणाधिकारी

(माध्यमिक) / शिक्षणनिरीक्षक यांनी दिनांक ११/०८/२०२३ ते १८/०८/२०२३ या दरम्यान करावे.

३. प्रत्येक जिल्हयातून गुणानुक्रमे दोन (२) विद्यार्थ्यांची निवड विभगीय स्पर्धेसाठी करण्यात यावी तालुका व जिल्हास्तरावरील विहित नमुन्यात सांख्यिकीय माहितीसह अहवाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तसेच या कार्यालयास दिनांक २०/०८/२०२३ पर्यंत सादर करावा.

अधिक वाचनासाठी किवां pdf Copy Download करण्यासाठी खालील Click Here वर टिचकी मारा

LINK - 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon