ITI आयटीआय ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Industrial Training Institute
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)
आयटीआय ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२४ सत्रासाठी प्रवेश सूचना
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२४ सत्रासाठी प्रवेश सूचना
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२४ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर "माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती दि. ०३ जून २०२४ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
राज्यातील औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश
प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये
दि. ०३ जून २०२४ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन
सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश
पध्दती,
नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व
तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा
अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या
दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत
कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी.
-: अर्ज करण्याची पध्दत :- |
२.
उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास
करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ३.
अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातुन भरता येईल सर्व औ प्र संस्थांमध्ये प्रवेश अर्ज
व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
५. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर
उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा
नोंदणीक्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.
६. उमेदवाराने त्यांच्या
प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन "Admission
Activities" या मथळ्याखाली "Application
Form" वर क्लिक करुन संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात
सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनःश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज
शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन जमा करावे.
८. प्रवेश अर्ज शुल्क :
८.१ राखीव प्रवर्ग (Reserved
Category): रु १००
८.२ अराखीव प्रवर्ग (UnReserved
Category): रु १५०
८.३ महाराष्ट्र
राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) : रु.३००
८.४ अनिवासी भारतीय
उमेदवार (Non Residential Indian): रु.५००
उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Qut) घ्यावी.
१०. प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation):
१०.२. अर्ज स्विकृती
केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर
केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास
त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज / कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास "अर्ज
निश्चितीकरण पावती" (Application Confirmation Slip) व
निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.
१०.३. अर्ज स्विकृती
केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मूळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करतील.
१०.४. उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित
करण्यासाठी औ.प्र. संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.
१०.५. प्रवेश अर्ज
निश्चित केल्यानंतर औ.प्र. संस्था मूळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास
संपर्क साधावा.
११. निश्चित केलेल्या
प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले
अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.
१२. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर
उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही
प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर "हरकती
नोंदविणे" या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करून तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
१३. प्रवेश अर्ज
निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration Number) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन "Submit/Change Options/Preferences" व्दारे सादर करावेत.
१४. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय
विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापील
प्रत (Print Out) घ्यावी.
१५. उमेदवाराने एकच
अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेतून बाद होईल.
१६. अनिवासी भारतीय व
इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखिल दि. ०३ जून २०२४ पासूनच ऑनलाईन
प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य
सादर करणे आवश्यक आहे.
१७. प्रत्येक प्रवेश
फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login करून निवडपत्राची प्रिंट घेवून निवड
झालेल्या औ.प्र. संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे.
उमेदवारांना निवडपत्राची (Allotment Letter) छापील प्रत (Print
Out) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखिल घेता येईल.
१८. उमेदवाराने त्यास
बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती
पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी
आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास
उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश
फेऱ्यांतुन बाद करण्यात येईल.
-: प्रवेशाचे
वेळापत्रक :-
महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र
राज्य |
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या कडील
जून २०२४ प्रवेश सूचना व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी |
ITI Admission
Portal Link
८. प्रवेश अर्ज शुल्क : ८.१ राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु १०० ८.२ अराखीव प्रवर्ग (UnReserved Category): रु १५० ८.३ महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) : रु.३०० ८.४ अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु.५०० उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Qut) घ्यावी.
|
विद्यार्थांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
या संकेतस्थळावर भरावा.
व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या कडील ऑगस्ट २०२४ प्रवेश
सूचना व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon