DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Har Ghar Tiranga घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा

  

🇮🇳 
 Har Ghar Tiranga Abhiyan 2023 

"हर घर तिरंगा "

विषय - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा " या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत..

संदर्भ- १. F. ११०३३६/०१/२०२३/KVS (HQ) /Acad/C-२०५१२ / AKAM DI. १०/०८/२०२३ २. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. १०/०८/२०२३

            उपरोक्त विषयान्वये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा " या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२३ ते दि. १५/०८/२०२३ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.

            सदर उपक्रमाचे उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.

            सबब त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यांनी सूचित करावे.

तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल विभागाने यापूर्वी दिलेल्या CLICK HERE  या लिंकवर सादर करावा.

 

रमाकांत काठमोरे

सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,

 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे, दि ११ ऑगस्ट २०२३ चे पत्र pdf मध्ये 
Download करण्यासाठी CLICK HERE टिचकी मारा 


    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट ते  १५ ऑगस्ट, २०२३  या कालावधीत राबविण्याबाबत शासन निर्णय Govt GR  Download करण्यासाठी CLICK HERE टिचकी मारा 

The Tri-colour flag is a symbol of pride for every Indian. It represents national integrity and signifies the hopes and aspirations of the Indian people.

Hoist a flag at your house from Date 13-15 August 2023

तिरंगी ध्वज हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. हे राष्ट्रीय अखंडतेचे प्रतिनिधित्व करते आणि भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवते.

दिनांक १३-१४ ऑगस्ट २०२३  पासून आपल्या घरावर ध्वज फडकावा

आणि प्रमाणपत्र Download करा 

 आता आपण खालिल Click Here वर Click / टिचकी मारा  आणि खली सांगितल्या प्रमाणे कृती करा 

'हर घर तिरंगा' या अभियानात प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा

Har Ghar Tiranga Certificate 

har ghar tiranga celebrate and get Certificate 


आकर्षक प्रमाणपत्र मिळवा

आगदी सहज सोपे 

कसे व्हाल सहभागी ? 
खलील पायऱ्या नुसार कृती करा 
Selfie with the flag 
ध्वजास ह छायाचित्र काढा 

 प्रथम कृती 

सर्व प्रथम PIN A FLAG वर Click / टिचकी मारा 


त्यानंतर असा संदेश आपल्या समोर येईल 

Allow harghartiranga.comto access your location ?

Allow            Block
harghartiranga.com ला तुमचे लोकेशन ऍक्सेस करण्याची परवानगी द्यायची?

परवानगी द्या म्हणजेच Allow  वर Click / टिचकी मारा Block करू नका 

 द्वितीय कृती 

नाव व भ्रमण ध्वनी टाका 
Name 
Mobile 
or
काळजी पूर्वक नोंदवा 
किंवा 
Continue with Google वर Click / टिचकी मारा 



 तृतीय कृती 

तुमचे लोकेशन ऍक्सेस करण्याची परवानगी द्यायची?

परवानगी द्या म्हणजेच Allow  वर Click / टिचकी मारा 


 चतूर्थ  कृती 

राष्ट्र ध्वज फडकवा 

आणि  हॉटस्पॉट स्थानामध्ये ध्वज पिन करून आमच्या वेबसाइटवर वैशिष्ट्यीकृत व्हा


आणि प्रमाणपत्र Download करा 

 आता आपण खालिल Click Here वर Click / टिचकी मारा  आणि वर सांगितल्या प्रमाणे कृती करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon