जागतिक परिचारिका दिन
International Nurses Day
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
Florence Nightingale
सर्व इयत्ता व सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा सोडवा
Solve QUIZ
CLICK HERE
आधुनिक परिचर्येचा पाया घालणारी ब्रिटिश प्रणेती फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिन. आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.जगभरात दरवर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन अर्थातच International Nurses Day म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी आधुनिक परिचर्येचा / नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो.
या दिनाचे वैशिष्ट्य नेमके काय?
तसेच या दिनाचा इतिहास आणि महत्त्व काय हे जाणून घेऊयात परिचारिका दिनाचा इतिहास १२ मे १८२० रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचे पालनपोषण इंग्लंडमध्ये झाले. त्यांना वयाच्या १६ व्या वर्षी जाणीव झाली की, आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचे होते. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिले जात नसे. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि सन १८५१ मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. सन १८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केले.सन १८५४ मध्ये क्रीमिया युद्ध झाल तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवले होते ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचे युद्ध रशियासोबत होते.
युद्धात सैनिक जखमी झाल्याचे आणि मृत पावल्याचे वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचे पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचे पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला.फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिले. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली.
युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. सन १८५६ मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.
दि १३ ऑगस्ट, १९१९ रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचे निधन झाले. फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते.
Credit - Google माहिती स्त्रोत
CLICK HERE To Solve Quiz
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon