DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक संगणक साक्षरता दिन प्रश्न मंजुषा / सायबर जागरूकता दिवस अंतर्गत सत्र / फेक वेबसाईट कशा ओळखाव्यात ? World Computer Literacy Day Quiz / Cyber ​​Awareness Day Session / How to Identify Fake Website?

World Computer Literacy Day Cyber ​​Awareness Day Session / How to Identify Fake Website?

फेक वेबसाईट कशा ओळखाव्यात ?

कृपया मार्गदर्शक व्व्हिडीओ बघा 

 

जागतिक संगणक साक्षरता दिन प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी  या ओळीला स्पर्श करा 

 

        सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे.प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे.जसा त्याचा वापर वाढला आहे तसे आपले धोके पण वाढले आहेत. आपणास काहीही शोधायचे असेल,काहीही माहिती हवी असेल तर आपण सहज म्हणतो गुगल सर्च कर ना,पण हे करत असताना आपण याचीही काळजी घ्यायला हवी की आपण सर्च करत असलेल्या वेबसाईट या फेक तर नाहीत ना,कारण अशा फेक वेबसाईटमुळे आपणास मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.कारण अशा फसव्या वेबसाईट च्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेयर येण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे आपण याबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

        सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे.प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे.जसा त्याचा वापर वाढला आहे तसे आपले धोके पण वाढले आहेत. आपणास काहीही शोधायचे असेल,काहीही माहिती हवी असेल तर आपण सहज म्हणतो गुगल सर्च कर ना,पण हे करत असताना आपण याचीही काळजी घ्यायला हवी की आपण सर्च करत असलेल्या वेबसाईट या फेक तर नाहीत ना,कारण अशा फेक वेबसाईटमुळे आपणास मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.कारण अशा फसव्या वेबसाईट च्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेयर येण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे आपण याबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

Permission Request –

       काही वेबसाईट किंवा Apps पण ओपन केल्यानंतर आपणास Permission Request / Permission Required
मागितल्या जातात. त्या Permissions / परवानगी आपण काळजीपूर्वक वाचायला हव्यात.कारण त्याद्वारे काही फसव्या लिंक्स हॅकर्स युजर्सच्या मोबाईल मध्ये टाकतात आणि त्याद्वारे हेरगिरी करतात.
वेबसाईटचे URL चेक करा
       कोणत्याही वेबसाईट वापरताना त्याचा URL चेक करा शक्यतो शॉपिंग वेबसाईट्स, बँकिंग वेबसाईट्स अशा वेबसाईट वापरताना विशेष काळजी घ्या. कारण अशा ठिकाणी आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते येथेच स्मार्टफोन फिशिंग जास्त प्रमाणात होत असतात.वेबसाईटच्या अड्रेस मधील स्पेलिंग नीट चेक करा यामध्ये थोडा फार बदल करुन मूळ वेबसाईट सारख्या फसव्या वेबसाईट बनवलेल्या असतात.
वेबसाईट वरील साहित्य पहा
       वेबसाईटवर प्रसारित केलेले साहित्य एक तर तूटपुंजे असते किंवा चुकीचे असते. यामध्ये लिहिण्यात आलेल्या टेक्स्ट मध्ये स्पेलिंग मध्ये चुका असतात.अशी वेबसाईट फसवी आहे हे समजून घ्यावे. 
Virus Total वेबसाईट चा वापर करा
       Virus Total ही एक प्रसिद्ध वेबसाईट आहे. ज्यामध्ये आपणास URL चेक करता येतो. येथे खऱ्या वेबसाईट फसव्या वेबसाईट चीही माहिती मिळत असते.
वेबसाईटचे URL चेक करा म्हणजे काय कराल ?  
डेंजरस लिंक्स ओळखायच्या कशा ?
        तर माझ्या मित्राचे फेसबुक पेज हॅक झालं हे काल सांगितले. त्याला आलेल्या एका मेसेज मधल्या लिंकवर
त्याने क्लिक केलं म्हणून ते झालं असावं हेही सांगितलं. त्याला आलेल्या मेसेजमध्ये तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा असा सांगून एक लिंक दिली होती. अर्थातच तिनं क्लिक केलं आणि पुढचं रामायण घडलं हेही काल सांगितले
दिवसभरात आपण अनेक कारणांसाठी अनेक लिंक्स क्लिक करत असतो. त्यातल्या खऱ्या कोणत्या आणि खोट्या, फसव्या किंवा डेंजरस कोणत्या हे ओळखायचं कसं ?
कोणतीही लिंक (म्हणजे URL) ही अशी दिसते :
http:// example . com / some_path ?some_information
या लिंकचे चार भाग असतात. पहिला HTTP  (किंवा HTTPS)  हा शब्द. दुसरा भाग म्हणजे डोमेन किंवा वेबसाईटचं नावं (example . com). तिसरा भाग म्हणजे त्या डोमेन किंवा वेबसाईटवरचा विशिष्ट पाथ किंवा पान. आणि चौथा भाग म्हणजे प्रश्नचिन्हा नंतर येणारी काही माहिती. यातले पहिले दोन भाग अत्यंत महत्वाचे!
कोणतीही लिंक क्लिक करताना URL चे पहिले दोन भाग डोळ्यांत तेल घालून बघितलेच पाहिजेत.
       URL चा पहिला भाग HTTP किंवा HTTPS. फक्त एका S चा फरक, पण अत्यंत महत्वाचा. यातला S म्हणजे Secured! जेंव्हा लिंकमध्ये फक्त http असतं तेंव्हा आपण पाठवलेली कोणतीही माहिती सुरक्षित नसते. ती अधलामधला कोणीही हॅकर अडवून वाचू शकतो आणि वापरू शकतो. कुठेही कधीही रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन किंवा ऑनलाईन पेमेंट वगैरेसाठी लिंक आली तर ती नुसती http नसून https च आहे का हे आपण तपासलं पाहिजे! आणि ती https असेल तरच क्लिक केलं पाहिजे.
URL चा दुसरा भाग म्हणजे डोमेन नेम  (किंवा वेबसाईटचे नाव)
       माझ्या मित्राला मेसेजमध्ये आलेली लिंक अशी होती: http://ow. ly /9wUu30fouF (कृपया ही लिंक क्लिक करू नका!)
पाहिजे!  आता जर फेसबुकने ही लिंक पाठवली असेल तर URL च्या दुसऱ्या भागात facebook. com किंवा fb. com असायला पाहिजे. पण इथे भलतंच काही तरी नाव आहे (ow.ly). पण घाईघाईत आपण हे नाव वाचत नाही किंवा दुर्लक्ष करतो. URLच्या दुसऱ्या भागातलं नाव, डोमेन नेम किंवा वेबसाईटचं नाव काय आहे हे कोणतीही लिंक क्लिक करायच्या आधी वाचलंच पाहिजे ! 
URL शॉर्टनर मी दाखवल्याप्रमाणे काहीतरी बनवणार नाही का? उदा. www.apalaimarathi.com साठी, Google चे URL शॉर्टनर goo.gl/pq7VQR बनवते. पहिल्या नजरेतून, एखाद्याला क्लिक करण्याचा मोह होऊ शकतो कारण ते goo.gl आहे म्हणून Google हे नैसर्गिक गृहितक म्हणून येते. त्याचप्रमाणे, ow.ly - जरी भितीदायक असले तरी - वैध, निरुपद्रवी URL कडे निर्देश करू शकते. मला वाटते की लहान URL सह अधिक सावधगिरी बाळगणे हा माझा मुद्दा आहे.
Google आणि Bit.ly सेवा या सर्वात सुरक्षित आहेत, परंतु स्त्रोत अज्ञात असल्यास तुम्ही आत्मविश्वासाने त्यावर क्लिक करू शकता. आपल्या  (डिजिटल) जीवनात कधीतरी, आम्हाला सोशल नेटवर्क्सवर लहान लिंक्स किंवा URL मिळतील, उदाहरणार्थ, तुम्ही त्या टाळू शकत नाही. ते अत्यंत उपयुक्त आहेत यात शंका नाही. ट्विटमध्ये, उदाहरणार्थ, प्रसिद्ध १४० वर्ण मर्यादा आहे , एक लहान URL काहीतरी वेगळे लिहिण्यासाठी जागा तयार करते. शिवाय, ते इतर वैशिष्ट्ये देखील देतात, तरी यापैकी एक दुधारी तलवार बनली आहे, ती तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे माहित नाही.या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक चालावे लागेल. एक लहान लिंक खरोखर एक रहस्य आहे. ती तुम्हाला कोणत्या वेबसाइटवर घेऊन जाईल किंवा स्क्रीनवर काय दिसेल हे तुम्हाला माहीत नाही. यामुळे, या लहान केलेल्या URL मालवेअर आणि फिशिंगसाठी योग्य साधन आहेत. तरीही घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना दररोज Twitter वर भेटत असल्यामुळे आणि त्यांच्यात एक ओंगळ आश्चर्य असू शकते याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण एक बूबी / बोबी ट्रॅप (निरुपद्रवी दिसणार्‍या वस्तूला स्पर्श केल्यावर निसटून जाण्यासाठी तयार केलेले लपवलेले स्फोटक उपकरण) आहे. काही साधी सावधगिरी आणि सामान्य ज्ञान तुमच्या संगणकावरील आपत्ती टाळू शकते.प्रथम, जर तुम्हाला Bit.ly किंवा Google च्या लहान लिंक्स आढळल्या तर येथे एक छोटी युक्ती आहे. लिंक कॉपी करा, तुमच्या ब्राउझर अॅड्रेस बारमध्ये पेस्ट करा आणि 'एंटर' दाबण्यापूर्वी, "+" चिन्ह जोडा. अशा प्रकारे तुम्ही URL शी संबंधित आकडेवारी पाहू शकता आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, इतर गोष्टींबरोबरच ती तुम्हाला कोणत्या वेबसाइटवर घेऊन जाते ते तुम्ही पाहू शकता.
       याव्यतिरिक्त, फिशिंग हे आजकाल URLs पुरते मर्यादित नाही परंतु ते प्रतिमां पर्यंत विस्तारले आहे (जे सामान्यतः स्वयंचलित डाउनलोड केले जातात - उदा. लोगो - जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा म्हणा, तुमचा नियमित ईमेल) आणि संलग्नक. URL वर क्लिक करण्या व्यतिरिक्त ते उघडणे किंवा स्वयं-डाउनलोड करणे याबद्दल जागरूक असणे चांगले.जेव्हा एखादा प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी शोधू लागतो, तेव्हा तुम्हाला जे डाउनलोड करायचे आहे त्याशिवाय कशावरही क्लिक न करण्याची अतिरिक्त काळजी घ्या. असे केल्याने तुमच्या लक्षात न येता तुमच्या संगणकाचे नुकसान होऊ शकते.अँटीव्हायरस सारख्या ब्राउझर सुरक्षा प्लगइनवर विश्वास ठेवा. किंवा तुम्ही अॅडब्लॉकर्स सारख्या विस्तारांचा वापर करून धोके कमी करू शकता जे ब्राउझरला अतिरिक्त पॉपअप तयार करण्यासाठी जोडते आणि प्रतिबंधित करते.

  




  



    फायरफॉक्ससाठी, तुम्ही Unshorten.it ची संबंधित आवृत्ती वापरू शकता. वेबसाइट लहान केलेल्या लिंक्सचा विस्तार करते, फायरफॉक्ससाठी अॅड-ऑन थेट ब्राउझरवरून करतो, ज्यामुळे तुमची काही सेकंदांची बचत होते. ब्राउझरमध्ये नवीन टॅब उघडण्याऐवजी आणि URL कट आणि पेस्ट करण्याऐवजी, या विस्ताराचा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त लहान केलेल्या दुव्यावर उजवे - क्लिक करावे लागेल आणि 'या लिंकला अनशोर्ट करा' पर्याय निवडावा लागेल.



    तुम्ही गुगल क्रोम वापरत असल्यास, तुमच्याकडेही भरपूर पर्याय आहेत. उदाहरणार्थ, लाँग यूआरएल एक अॅड-ऑन आहे जो लहान केलेल्या दुव्याशी संबंधित सर्व डेटा प्रदर्शित करतो - URL सह - जेव्हा तुम्ही त्यावर कर्सर पास करता. तुम्ही निवडलेल्या पद्धतीची पर्वा न करता, पेज प्रामाणिक आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला काही सामान्य ज्ञान वापरावे लागेल. जेव्हा तुम्ही लिंक विस्तृत करता आणि वेबसाइटचे नाव परिचित नसते किंवा तुम्ही जे पाहता ते पूर्णपणे न समजणारा वेब पत्ता असतो, तेव्हा तुम्ही सावध राहणे आणि तेथे न जाणे चांगले. या प्रकरणात, 'क्षमस्वापेक्षा सुरक्षित' ‘Better safe than sorry’.ही म्हण अगदी योग्य आहे.

       हॅकर्सचा सगळा गेम इथे असतो. आपल्याला फेसबुक किंवा गूगल (किंवा तुमची बॅंक) यांच्याकडून मेल आला असे भासवतात आणि क्लिक करायची लिंक मात्र भलत्याच कोणत्या ठिकाणची असते. ते ठिकाण कोणतं हे URL च्या दुसऱ्या भागात आपल्याला स्पष्ट दिसतं ! त्यामुळे कोणतीही लिंक पूर्णपणे वाचल्याशिवाय आणि त्याचे पहिले दोन भाग नीट वाचून त्याचा अर्थ लावल्याशिवाय त्यावर कधीही क्लिक करायचं नाही ! आपल्याला आलेल्या कोणत्याही संदेशामधली कोणतीही लिंक किंवा URL ही अशा पद्धतीनं वाचणं आणि मग ती योग्य का अयोग्य हे ठरवून त्यावर क्लिक करणं हे इतकं तरी आपण केलं पाहिजे. फेसबुक पासून ते आपल्या बॅंक अकाउंट पर्यंत आपलं कोणतही अकाउंट कधीही हॅक होऊ नये यासाठी हे इतकं बेसिक तर आपण केलंच पाहिजे! एका मित्राचा मेसेज आला कीत्याचे फेसबुक पेज हॅक झाले. त्या पेज वरून भलतेच कोणी ऍड्स चालवत आहे. जरा तपास केल्यावर असे लक्षात आले की,त्याला  'तुमचं अकाउंट / पेज कोणीतरी रिपोर्ट केलं आहे आणि ते डी-ऍक्टिव्हेट होणार आहे' असा मेसेज आला होता. ते डी-ऍक्टिव्हेट होऊ नये म्हणून तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून अकाउंट व्हेरिफाय करा असं त्या मेसेज मध्ये लिहिले होते.  

       त्याने अर्थातच घाबरून जाऊन घाईने ती लिंक क्लिक केली. त्या लिंककवर आलेल्या पानावर आपला फेसबुक पासवर्ड वगैरे देऊन लॉगिन केलं. आणि पुढच्या काही मिनिटांत त्याचे पेज हॅक झाले हा अगदी पद्धतशीर सापळा असतो. तो ओळखायचा आणि टाळायचा कसा याच्या काही टिप्स ! तर अत्यंत महत्वाची टिप अशी की कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी ती कोणाकडून (म्हणजे कोणत्या स्रोतातून / सोर्स कडून आली आहे आणि ती लिंक नेमकी काय आहे हे लक्षात घ्यायला हवं.

 स्रोत / सोर्स - माझ्या मित्राला आलेला मेसेज हा खरंतर मेसेज नव्हता. Blocking Page नावच्या ऑफिशियल दिसणाऱ्या ID नी त्याचा पेजच्या वॉलवर मेसेज पोस्ट केला आणि तो शेअर केला.

येथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की अकाउंट डी-ऍक्टिवेशन किंवा व्हेरिफिकेशन सारखे महत्वाचे मेसेजेस फेसबुक आपल्या वॉलवर (किंवा पेजवर) कधीच पोस्ट करत नाही. आपल्याला नोटिफिकेशन सेंटर किंवा सिक्युरिटी रिव्ह्यू मध्ये दाखवत. त्यामुळे आपली (किंवा आपल्या पेजची) वॉल ओपन असेल तर त्यावर आलेल्या कोणत्याही, अगदी ऑफिशियल दिसणाऱ्या आयडी कडून आलेल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.

आपल्याला कोणताही मेसेज कोणी पाठवला आहे हे तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यानं पाठवलाय तो कसा पाठवलाय हेही बघणं गरजेच आहे. हे कसं तपासायचं? या विषयी पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू या

देश में रिकॉर्ड वैक्सीनेशन होने की ख़ुशी में सभी भारतीय यूजर्स* को 3 महीने* का रिचार्ज फ्री में दिया जा रहा है।  

अगर आपके पास *Jio*, *Airtel* या *Vivo  का सिम हैं तो आप इस ऑफर का लाभ उठा सकते है । 

नोट:- नीचे दी गई लिंक पर क्लिक करके अपना फ़्री रीचार्ज प्राप्त करें। 

       https://ok.freerecharge.link       ( कृपया ही लिंक क्लिक करू नका ! )

कृपया ध्यान दे:* यह ऑफर केवल 30 NOVEMBER 2021 तक ही सिमित है!जल्दी करें..!

                pinkapp / IPL / Online move / amazon 

       मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या लिंक सध्या व्हाट्सअप वर धुमाकूळ घालत आहेत कृपया या ठिकाणी मुद्दामहून थोडक्यात लिंक कोड दिलेले आहेत  अशा प्रकारच्या लिंक वर कृपया क्लिक करू नये ह्या सर्व हॅकर्सच्या लिंक आहेत त्यामुळे आपल्या मोबाईल मधला डेटा चोरी होऊ शकतो आपली खाजगी माहिती ओपन होऊ शकते महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्हाट्सअपचे ऍक्सेस हॅकर्सच्या हाती जाते विशेष म्हणजे आपण एकदा या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपण ज्या ज्या  ग्रुपमध्ये सामील आहोत त्या त्या त्या ग्रुप वर हा मेसेज ऑटोमॅटिकली जातो आपल्याच्याने चुकून जर लिंक वर क्लिक झाले असल्यास खालील पद्धत अवलंबा खरेच असे होते का हे पाहण्यासाठी सुद्धा अशाप्रकारच्या लिंक वर क्लिक करू नका

यातून बाहेर निघण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा

Go to setting Apps Manager Online stream Apps Clear catch Clear Data Force Stop Uninstall 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सायबर जागरूकता अंतर्गत सत्र

सायबर जागरूकता दिवस अंतर्गत सत्र

 


इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यासाठी सायबर सत्र 
अधिकमाहितीसाठी खालिल चित्रावर Click  करा

Online सत्र Join करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon