DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राष्ट्रीय गणित दिवसा निमित्य श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुषा National Mathematics Day Quiz

राष्ट्रीय गणित दिवसा निमित्य श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुषा National Mathematics Day Quiz


******************************
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन जन्मदिन
******************************

जन्म - २२ डिसेंबर १८८७                
स्मृती - २६ एप्रिल १९२०
अलौकिक गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला.
        वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसऱ्या विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. 
 
        पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले. त्यांनी इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी.एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला १९१४ मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी १९१९ मध्ये ते मायदेशी परतले. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.  
                  
    रामानुजन सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामाककलची नामगिरी ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडत. त्यात असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यांच्या मते, गणिती सूत्र म्हणजे देवाच्या मनातील विचार, असा होता. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे दिसत, रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. 
    रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल. रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. 
 
    आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली.
    रामानुजन यांनी प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत काम केले. त्यांनी मांडलेल्या जवळपास ४००० सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत. 
रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले.
संदर्भ : इंटरनेट

आपण Upload केलेल्या  Post ची link खालील लिंकवर नोंदवा

  

राष्ट्रीय गणित दिवसा निमित्य श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुषा 

National Mathematics Day Quiz

श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुषा 
“निपुण भारत अभियान” अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे.  

नविन अद्यावत माहिती मिळविण्यासाठी आपल्या समुहा मध्ये सामिल व्हा.

आपल्या  YouTube चॅनेलला  Subscribe करा 



प्रत्येक शाळेत कोणते उपक्रम राबवावे हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ बघा 

 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 
दिनांक : १६/१२/२०२१.
जा.क्र. राशैसंप्रपम / गवि / FLN/२०२१/४२१६

विषय :- "निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय करणेबाबत... atriणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन

संदर्भ :- १) भारत सरकारच्या National Initiat For Proficiency In Reading with Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शक सूचना.

२) शासन निर्णय क्रमांकः: संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६. दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१. 

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य पातळीवर "निपुण भारत अभियान" सुरु करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN) विकसित व्हावे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
"निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या " गणितोत्सव" ची प्रमुख संकल्पना (Theme) "पायाभूत संख्याज्ञान" (FLN -foundational Numeracy) ही निश्चित करण्यात येत आहे.

पुढे अधिक वाचा

खालिल पत्र वाचा Download करा 

 

आपण Upload केलेल्या  Post ची link खालील लिंकवर नोंदवा 
 


श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित  ४० गुणांची प्रश्न मंजुषा सोडवा 

 

मागील सर्व सामान्य ज्ञान चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

मागील सर्व दिन विशेष चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

गणित मैत्री प्रश्नमंजुषा Math  Quiz   सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

हिंदी व्याकरण विसर्ग संधि , स्वर संधि, या घटकावर आधरित ऑनलाइन चाचणी  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

मागील सर्व सामन्य ज्ञान चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

मागील सर्व दिन विशेष चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon