DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

भारतीय शेतकरी दिवस - विशेष : प्रश्नमंजुषा National Farmers Day Quiz

भारतीय शेतकरी दिवस  - विशेष : प्रश्नमंजुषा  National Farmers Day Quiz  

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

राष्ट्रीय शेतकरी दिवस

शेतकरी दिन का साजरा केला जातो ?
    चौधरी चरणसिंग: भारताचे पाचवे पंतप्रधान हे शेतकरी कुटुंबातील चौधरी चरण सिंह होते. शेतकऱ्यांचा मसिहा मानले जाणारे चौधरी चरणसिंह यांचा जन्म २३  डिसेंबर १९०२ रोजी झाला. चौधरी चरणसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.  
    भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यामागे चौधरी चरणसिंह यांचा खुप मोठा वाटा आहे याचे श्रेय त्यांना जाते. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्यामुळे चौधरी चरणसिंह यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक सुधारणेची कामे केली.
    चौधरी चरणसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राच्या व शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक चांगली धोरणे तयार करण्यात आली.  
    चौधरी चरणसिंग हे २८ जुलै १९८९  ते १४  जानेवारी १९८०  येवढा कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी कठोर परिश्रम घेतले. एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण म्हणून सन २००१ मध्ये सरकारने चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी दिन महत्व :

    शेतकरी दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण की या निमित्ताने समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन उपक्रम, शेतीविषयी,उद्योगांविषयी माहिती देऊन सक्षम बनविण्याची कल्पना दिली जाते.  शेतकर्‍यांना आपल्या शेतात अन्न पिकवण्यासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात त्याची जणीव लोकांना व्हावी आणि शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांबद्दल लोकांना माहिती करण्याचे काम शेतकरी दिन या दिवशी केले जाते.
    देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी सर छोटू राम यांचा वारसा पुढे नेला, त्यांनी २३ डिसेंबर १९७८रोजी किसान ट्रस्टची स्थापना केली, ज्यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात आली.


 


 हेही वाचा 
जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत करणे बाबत महाराष्ट्र शासन
शासन निर्णय २२ ऑगस्ट २०२२ 

जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत.... GR

 वाचा किंवा DOWNLOAD करा  CLICK HERE 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon