DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

मौलाना अबुल कलाम आझाद तथा राष्ट्रीय शिक्षण दिन : प्रश्न मंजुषा सोडवा National Education Day / Maulana Azad

महान स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा !  

National Education Day Maulana Abul Kalam Azad

          भारताचे महान स्वातंत्र्यसेनानीप्रख्यात शिक्षणतज्ज्ञभारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो.देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता.

मौलाना आझाद यांच्याविषयी जाणून घेऊ -  मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता.त्यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते. मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते.

        स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले.मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. मौलाना आझाद यांना आझाद या नावाने ओळखले जात होते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेले आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांनाच दिलं जातं.

       त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी (१९५३)साहित्य अकादमी (१९५४) आणि ललितकला अकादमी (१९५४) सारख्या संस्थांची देखील स्थापना केली.

    दरवर्षी ११  नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्यसेनानीप्रख्यात शिक्षणतज्ज्ञभारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.

      मौलाना आझाद यांनी उर्दूपर्शियनहिंदीअरबी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. सोळा वर्षांत यांनी त्याने सहसा २५ वर्षांत घेतले जाणारे सर्व शिक्षण प्राप्त केले होते. तर अशा या राष्ट्रीय शिक्षण दिनादिवशी मौलाना आझाद यांनी देशाबरोबरच शिक्षण जगासाठी दिलेले अमूल्य योगदान आठवले जाते. हा दिवस भारतामधील शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे         

      सर्व शिक्षण अभियानासह भारतातील शिक्षणासाठी अनेक मोहिमा राबविल्या जातात. सरकार आता प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमधील मुलांना मोफत शिक्षण देत आहे आणि आपल्या देशातील शिक्षणाची पातळी सतत वाढवत आहे. या सर्वांमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले गेलेले मौलाना अबुल कलाम यांचे फार मोठे योगदान आहे. म्हणूनच त्यांना सन १९९२ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विद्येविना मती गेली।

मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली।

गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले

       राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा ! शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येतेसर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

मौलाना अबुल कलाम आझाद तथा राष्ट्रीय शिक्षण दिन : प्रश्न मंजुषा सोडवा

 

 

आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon