ग्रहणचक्र Grahanchakra Eclipse cycle
नको सूर्य ग्रहणाची भीती कारा विज्ञानाशी दोस्ती
ग्रहण ( सूर्यग्रहण )
सूर्यग्रहणे
(१) सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल एका सरळ रेषेत व समपातळीत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते.
(२) चंद्राची सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते.
(३) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची दाट सावली पडते. तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खग्रास सूर्यग्रहण' होय. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते.
(४) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली पडते, तेथून सूर्य अंशतः झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खंडग्रास सूर्यग्रहण' होय,
(५) काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही.
ती अवकाशातच संपते. त्यामुळे अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची केवळ प्रकाशमान कडा एखादया बांगडीप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते.
सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये
(१)सूर्यग्रहण अमावास्येला होते, परंतु ते प्रत्येक अमावास्येला होत नाही.
(२) सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते.
(३) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) असतो.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon