DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

WhatsApp स्वाध्याय उपक्रम मुलभूत भाषा व संख्या ज्ञानावरील प्रश्न

स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा 

स्वाध्याय (SWADHYAY) या आठवड्यात परत येत आहे! (दि १५  मे २०२१ पासून)

ह्या आठवड्या (दि. १५/०५/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध :
कोणासाठी - १ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी
माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू
विषय - गणित
१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१) पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत. 
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत* म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल. 

 

आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे

१७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.
महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDISE नंबर घ्या. स्वाध्याय पूर्ण करा. आणि हो, उर्दू माध्यम विद्यार्थ्यांनी गणित विषय संपल्यानंतर २ आकडा लिहून स्वाध्याय मधून बाहेर पडता येईल

 Whatsapp स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे या सबंधीच्या मार्गदर्शक पायऱ्या 

Whatsapp स्वाध्याय उपक्रम हा इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यासाठी आहे.

 =》 प्रथम वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा 

 =》 त्यानंतर आपण नवीन विंडो मध्ये ConveGenius whatsapp DP असलेल्या मेसेज box मध्ये  अगोदरच ' नमस्कार '     असे लिहिलेले दिसेल याठिकाणी आपल्याला फक्त send च्या चिन्हावर टिचकी मारायची आहे

=》माध्यम निवडा  =》मराठीसाठी 1 , सेमिसाठी 2 , उर्दूसाठी 3  योग्य पर्याय निवडून पाठवा   

=》त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत साठी 1 , मला सर्व अटी व शर्ती मंजूर नाहीत 2 पाठवा 

=》त्यानंतर तुम्ही शिकत आसेलेल्या शाळेचा UDISE क्रमांक नोंदवायचा  

=》त्यानंतर इयत्ता निवडा

=》त्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा  

=》स्वाध्याय सुरु करण्यासाठी 1 निवडा   

=》त्यानंतर आपल्याला एक एक करून दहा प्रश्न विचरले जातील   

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक इंग्रजीतच ( अंकात )पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》शेवटी उत्तराची pdf पहावी 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon