DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

'जागतिक दिव्यांग दिन' : प्रश्नमंजुषा World Disability Day Quiz

 सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 
    अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी देशात सर्वत्र सेवाभावी संस्था संघटना राजकीय पक्ष शासन भांडत असून इतरांच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तींच्या समस्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत  त्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने अपंग व्यक्ती हक्क अधिनियम १९९५  अपंग पुनर्वसन कायदा करत नोकरी तीन टक्के आरक्षण केले त्यानुसार केंद्र व राज्य सरकारने शासन निर्णय पारित करून धोरणात्मक निर्णय घेत अपंगांना सोयी सवलती देण्याचे काम सुरू झाले सन १९९६  मध्ये केंद्रीय अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करत रेल्वे प्रवासात सवलत दिली महाराष्ट्र राज्य सरकारने १९९७  रोजी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करत बेरोजगार दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज योजना सुरू केली 

    बस बस प्रवासात सवलत दिली त्यानंतरत्यानंतर सन २०१६ चा दिव्यांग हक्क अधिनियम कायदा केंद्र सरकारने करत या कायद्यानुसार दिव्यांगाची सात प्रकारावरून एकवीस प्रकार करण्यात आले असून अपंगांना नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे आज देशभरात अपंग व्यक्तींची संख्या तीन कोटी पेक्षा जास्त असून महाराष्ट्र राज्यात जवळपास ३५ लाखाच्या आसपास दिव्यांग बंधू भगिनींची संख्या आहे 

जागतिक अपंग दिन का साजरा केला जातो ? 

दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस (डिसेंबर ३) हा 1992  पासून संयुक्त राष्ट्रांनी प्रोत्साहन दिलेला आंतरराष्ट्रीय पाळणा आहे. ... दिवस पाळण्याचे उद्दिष्ट अपंगत्वाच्या समस्यांबद्दल समजून घेण्यास प्रोत्साहन देणे आणि सन्मान, हक्क आणि कल्याणासाठी समर्थन एकत्रित करणे आहे.                                                                      

    या वर्षी, दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिवस 2021 ची थीम 'कोविड 19 नंतरच्या सर्वसमावेशक, प्रवेशयोग्य आणि टिकाऊ जगाकडे अपंग व्यक्तींचे नेतृत्व आणि सहभाग' आहे. जागतिक महामारीच्या काळात दिव्यांग लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी यूएनने ही थीम स्वीकारली आहे.                            

    कोणत्याही सरकारी विभागात अपंग, विकलांग, नि:शक्तजन असे शब्दप्रयोग न करता दिव्यांग म्हणावे,असे राज्य सरकारने पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यालयांना दिली आहे. केंद्र सरकराने डिसेंबर 2016  मध्येच यासंबंधीची अधिसूचना काढलेली आहे, त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016  मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अपंगाचा गौरव करताना त्यांना 'दिव्यांग' हा शब्द दिला. तेव्हापासून अपंग शब्द बंद झाला असून दिव्यांग या शब्दाचा वापर सुरू झाला आहे. 27  डिसेंबर  2016  रोजी केंद्र सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातही 'दिव्यांग' शब्दच वापरणे अपेक्षित आहे. तरीही काही ठिकाणी त्याऐवजी जुनेच शब्द प्रयोग केल्याचे आढ‌ळून येत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष विभागाने 04 जुलैला परिपत्रक काढून यासंबंधी पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon