मराठी भाषा गौरव दिन प्रश्नमंजुषा Marathi Bhasha Gaurav Din Quiz Kusumagraj Jayanti
मराठी भाषा गौरव दिन !!! हार्दिक शुभेच्छा !!!
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. ... महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारा 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
फक्त चर्चा नव्हे, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
खऱ्या अर्थाने मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पण आज असे होताना दिसत नाही. आज अशाच काही परखड व महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचार करूया.
थोडं कटू पण सत्य :
इंग्रजी भाषे प्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे शिकवणे हे आपल्याला जमेल का ?
आपल्याला केवळ स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे !
केवळ एखादा दिवस मराठीच्या विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे कितपत योग्य आहे ?
आपल्या भाषेचा विकास ही सर्वांनी मिळून सातत्याने करायची गोष्ट आहे. चार-दोन लोकांनी, कधीतरी करायची गोष्ट नाही.इंग्रजी भाषेचे वर्चस्व असलेल्या देशांत जाऊन आपण तेथील भाषा निमूटपणे शिकायला तयार होतो. कारण आपल्याला आपल्या भौतिक प्रगतीशी देणेघेणे आहे.
मराठी भाषेचे जे काही झाले आहे त्याला मराठी भाषा जबाबदार नाही तर मराठी भाषक जबाबदार आहेत. कारण भाषा मरत नाहीत; भाषक मरतात.
आपल्या पैकी अनेकांना महत्त्वाच्या व्यवहार क्षेत्रांत मराठी भाषा वापरण्याची लाज वाटते. अपराधीपणाचे वाटते हि शोकांतिका आहे.
१९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्या नंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणेच आपल्याला योग्य वाटते.
आज तर मराठी शाळा बंद पडताहेत. ज्या चालू आहेत त्यांची मराठीकडून सेमी-इंग्रजीकडे आणि कालांतराने पूर्ण इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू आहे.
मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. कारण जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार ?
मराठीच्या ऱ्हासाला आपण सर्व जबाबदार आहोत. आपण सर्वांनी मिळून ठरवले तर ही स्थिती बदलू शकतो. त्यामुळे जबाबदारी झटकून कसं चालेल ?
आपलं भाषेवरचं प्रेम केवळ चर्चेत नव्हे तर जगण्यात आणि वागण्यात असायला हवे. आपल्या भाषेच्या अस्मितेसाठी येणाऱ्या पिढीला आपला समृद्ध वारसा आहे तसा दिला तर हे सर्व नक्की शक्य आहे.
विशेषतः आज मराठी संबंधी असे कटू पण स्पष्ट बोलणे अनेकांना रुचणार नाही. पण आपण जबाबदारी झटकून किती दिवस पळणार आहोत. हे काम कोणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा, इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
● या आणि आशा प्रकारच्या जाहिरातीसाठी / रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी
2 comments
Click here for commentsGood
ReplyGood
ReplyPlease do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon