भारतीय प्रजासत्ताक दिन प्रश्न मंजुषा Indian Republic Day Quiz
55
Subscribe to Next Update -
रंजक / मार्गदर्शक व्हिडिओ पाहा
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन मधील मुख्य फरक The main difference between Republic Day and Independence Day 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक .आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
संविधान रंजक माहिती भारतीय संविधानाबद्दल
महत्वाच्या गोष्टी
Indian Constitution Important Things
Indian Constitution Important Things
भारतीय प्रजासत्ताक दिन प्रश्न मंजुषा सोडवा
Next Update
Subscribe to Next Update -
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा अकोला जिल्हा Akola District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा सोलापूर Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
हे हि वाचा
बीटिंग रिट्रीट २९ जानेवारी
दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा कार्यक्रम दाखवला जातो
त्यासाठी ब्लॉग मधील TV Screen ला टिचकी मारा व त्यानंतर दूरदर्शनच्या लोगोवर टिचकी मारा आणि कार्यक्रम बघा कार्यक्रमास सुरवात झालेली आहे.
बिटिंग रिट्रीट हा वर्षातून एकदा २९ जानेवारीला होणारा कार्यक्रम. अत्यंत श्रवणीय आणि त्याहून अधिक प्रेक्षणीय .२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होतो
पूर्वीच्या काळी सूर्यास्ताच्या वेळी युद्ध थांबवण्यासाठी तुतारी,शंख यांचा घोष केला जात असे आणि हा आवाज आल्यावर त्या दिवसाचे युद्ध थांबवले जाई . पुढच्या काळात त्याची जागा बिगुलने घेतली ह्या प्रथेचे स्मरण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे दाखवण्यासाठी बिटिंग रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
बीटिंग रिट्रीट
पायदळ, हवाई दळ आणि नौदल अशा तीनही दळांच्या बॅंड बरोबर पंजाब रेजिमेंट, राजपुताना रायफल्स,दिल्ली पोलीस, बीएसएफ, बिहार रेजिमेंट,आयटीबीपी, गुरखा रेजिमेंट,अर्धसैनिक दले आदींचाही समावेश झालेला आहे.असे १७ बँड यात भाग घेतात. या सगळ्या बॅंड्सचे वादन श्रवणीय तर असतेच;आणि शिवाय त्यांची वाद्ये, त्यांचे पोषाख, त्यांचे संचलन आणि बॅंडच्या कंडक्टरचे इशारे हे सारे सारे अत्यंत प्रेक्षणीय असते. बॅंड मास्टरच्या केवळ इशाऱ्यावर वादन करणे, मार्चिंग करणे मार्चिंग करताना वेगवेगळी डिझाईन्स करणे हे सारे प्रेक्षणीयही असते. आणि कंडक्ट, म्हणजे बॅंडमास्टरच्या हालचाली, त्याचे इशारे पाहण्यात तर मोठा आनंद असतो.
मुळात ल्ष्कराबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. त्यांचे ते पोषाख, कडक शिस्त, शस्त्रे, प्राणांची बाजी लावण्याची जिद्द, हे सारे अंतर्मनात कुठेतरी जागा करून असते. त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकाव्या-वाचाव्याशा वाटतात. मात्र लष्कराच्या बॅंड बद्दल फारशी कोणाला माहिती नसते. त्यासाठी बीटिंग रिट्रीट हा कार्यक्रम अवश्य पाहावा-ऐकावा.
बीटिंग रिट्रीट हा ४ दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यचा समाप्तीचा कार्यक्रम असतो. दिल्लीतील रायसिना हिल्सच्या विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभाचे आयोजन दर वर्षी केले जाते. २६ जानेवारापासूनच राष्ट्रपती भवन आणि सर्व सरकारी इमारतींवर दिमाखदार रोषणाई केलेली असते. या समारंभाचे मुख्य अतिथी असतात राष्ट्रपती. पंतप्रधान आणि मंत्रि मंडळही उपस्थित असते .
दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा कार्यक्रम दाखवला जातो
१९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यापासून आतापर्यंत बीटिंग रिट्रीट कार्यक्रम फक्त दोन वेळा रद्द करण्यात आलेला आहे. २००१ साली गुजरातमध्ये बूकंप झाला तेव्हा आणि २००९ साली भारताचे राष्ट्रपती वेंकटरमन यांचा दीर्घकाळच्या आजारपणानंतर निधन झाले तेंव्हा
बॅंड वादनात कदम कदम बढाये जा, जय भारती, ताकत वतन की हमसे है, नन्हा मुन्हा राही हूं, आदी प्रसिद्ध मार्चिंग धून वाजवल्या जातातच, शिवाय नवनवीन लोकप्रिय गाणीही वाजवली जातात.
१९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात आपल्याला विजय मिळाला त्याला ५० वर्षे झाली,म्हणून या वर्षी स्वर्णीम विजय हे नवीन गाणे म्हटले जाणार आहे.
इतर वाद्यां शिवाय केवळ ड्रमर्सचेही वादन असते, ते देखील अत्यंत श्रवणीय आणि प्रेक्ष्णीय असते. नुसते ड्रम्स वाजतात ही कल्पनाच कशी वेगळी वाटते. पण त्यातही खूप व्हरायटी, कल्पकता असते. बीटिंग रिट्रीटच्य शेवटी मुख्य बॅंडमास्टर राष्ट्रपर्तींकडे जाऊन बॅंड परत नेण्याची अनुमती मागतात, तेव्हा कार्यक्रम संपल्याची सूचना मिळते. सारे जहांसे अच्छा हिंदुस्तां हमारा या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप होतो.
आज २९ तारखेला संध्याकाळी ५ (पाच) वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणामध्ये या वर्षीचे बीटिंग रिट्रीट पाहण्या-ऐकण्याची ओढ लागून राहिलेली आहे. तुम्हीही अवश्य बघा
कार्यक्रम संपल्या बरोबर मागील बाजूस असलेले राष्ट्रपती भवन हजारो दिव्यानी उजळून निघते ते अनुभवायलाच हवे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon