DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Balachitrakala Spardha बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन

Balachitrakala Spardha

Balachitrakala Spardha Online Nondani Link

Children's Painting Competition Online Registration Link

Balachitrakala Spardha 2026 Apply Link 

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

Maharashtra State Board of Art Education, Mumbai

क्रमांक कशिमं/२०२६/पाच/ 972

दिनांक :- 19 JUN 2026


वाचावे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक एडीआर-२०२५/CN-११८२७३२/प्र.क्र.७४/तांशि-६, दिनांक १४ जुलै, २०२५. वाचा यां ओळीला स्पर्श करा


परिपत्रक

संदर्भीय शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी 

https://www.msbae.ac.in 

या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या 

https://balchitrakala2026.msbae.in 

लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.

अ.क्र. इयत्ता गट स्पर्धा प्रवेश शुल्क

१. पहिली व दुसरी पहिला

२. तिसरी व चौथी दुसरा

३. पाचवी, सहावी व सातवी तिसरा

४. आठवी, नववी व दहावी चौथा


प्रति विद्यार्थी रु.२०/- या रक्कमेमधून ड्रॉईंग कागदाचा (११ इंच X १५ इंच या आकाराचा) खर्च रु.५/- वजा करुन उर्वरीत रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे ऑनलाईन जमा करावी.

शाळेची नोंदणी व विद्यार्थी नोंदणी कालावधी तपशील.

अ.क्र. तपशील

१ नोंदणी बालचित्रकला स्पर्धेकरिता संबंधित केंद्र / शाळा ऑनलाईन पासून  दि.०१.०७.२०२६ पर्यंत दि. ३१.०७.२०२६

२ बालचित्रकला स्पर्धेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे. (संबंधित केंद्र / शाळा मार्फत)   पासून दि.०१.०७.२०२६ पर्यंत दि. ३१.०७.२०२६

३ परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्वीकारणे  पासून दि.०२.०७.२०२६ पर्यंत दि. ३१.०७.२०२६

मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी

https://www.msbae.ac.in

शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा 

https://balchitrakala2026.msbae.in 

या लिंकवर भरावयचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.


(विनोद रं. दांडगे) 

संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.


परिपत्रक पीडीएफ लिंक बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

 क्रमांक कशिमं/२०२६/पाच/ 972

 दिनांक :- 19 JUN 2026 या ओळीला स्पर्फ्श करा 

Children's Painting Competition Online Registration Balachitrakala Spardha Online Nondani Link Balachitrakala Spardha 2026 Apply बालचित्रकला स्पर्धा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon