DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शासन व संचालनलायच्या मान्यतेसाठी शालार्थ २.० प्रणालीद्वारे थकीत देयकांचे परिपूर्ण प्रस्तवा पाठविणेबाबत थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27

Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27


शासन व संचालनलायच्या मान्यतेसाठी शालार्थ २.० प्रणालीद्वारे थकीत देयकांचे परिपूर्ण प्रस्तवा पाठविणेबाबत थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27


shasan v sanchalanlayachya manyatesathi shalarth 2.0 pranaleedvare thakit deyakanche paripurn prastava pathavinebabat.

शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे

क्र. शिसंमा / शालार्थ-०२ थ.वे. / परिपत्रक/टि-७/२०२६

दिनांक- स्ववाक्षरी खाली नमूद केल्यानुसार

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प., सर्व

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य), सर्व

    विषय:- शासन व संचालनलायच्या मान्यतेसाठी शालार्थ २.० प्रणालीद्वारे थकीत देयकांचे परिपूर्ण प्रस्तवा पाठविणेबाबत.

संदर्भ:-

१) शासन निर्णय क्र. संकिर्ण-२४१५/३४/१२)/ अर्थसंकल्प, दि.१५/०७/२०१७

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र, क्र. अंदाज-२०१/कीत वेतन/२०२१/३०७०, दि.०४/०८/२०२१

३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/आनलाईन/५०४७, दि.१२/९/२०२४

४) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२६/टि-७/थकीत/ऑनलाईन/८९४२५७/, दि.१२/०५/२०२६

५) शासन पत्र, क्र. वेतन १२२६/प्र.क्र.१४६/टिएनटी-३, दि.२७.७.२०२६

उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रांकडे अपले लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील खाजगी प्राथमक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकित देयके शालार्थ २.० प्रणालीद्वारे योग्य ती तपासणी/पडताळणी करुन, देयक प्रकाराच्या विषय निहाय तपासणी सूची प्रमाणे आवश्यक कागदगदत्र ऑनार्लन प्रणालीद्वारे शासन व संचालनालयाच्या मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या यापूर्वी वेळोवेळी संदर्भीय पत्रान्वये सूचना दिलेल्या आहेत.

तथापि क्षेत्रिय कार्यालयाकडून शालार्थ २.० प्रणालीद्वारे सादर करण्यात आलेल्या थकित देयक प्रस्तावांसोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यात येत नाहीत व प्रस्तवासोबत जोडलेली कागदपत्रे ही वाचता न येणारी (अवाचनीय) असतात. सद्यस्थितीत संचलनालयास मोठ्या प्रमाणात थकित देयकाबाबतचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. शासन व संचालनालय स्तरावरील छाननी दरम्यान परिपूर्ण प्रस्तावा अभावी परत पाठविण्यात आल्यास / देयके नाकारल्यास होणाऱ्या विलयांस आपली जाबाबदारी राहील,थकीत वेतन देयके शालार्थ प्रणाद्वारे ऑनलाईन सादर करणेबाबत शासन, शिक्षण आयुक्तालय व संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी देलेल निर्देशनुसार तसेच खालील नमूद बाबींची कागदपत्रे / अभिलेखे यांच्या प्रती प्रस्तावासोबत सादर करण्यात याव्यात.

१. शालार्थ प्रणाली २.० वर देयक प्रस्ताव सादर करताना Employee Detalls व Service Record Detalls पूर्ण व अचूक भराव्यात.

२. संबंधित कर्मचाऱ्याचा नियुक्ती आदेश, सेवापुस्तिकेतील आवश्यक नोंदी/उतारे, वेतन निश्विती, थकबाकी गणना पत्रक तसेच इतर आवश्यक प्रमाणित कागदपत्रे प्रस्तावासोबत अपलोड करावीत.

३. सर्व कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली असावीत.

४. सेवा कालावधीच्या अनुषंगाने नियुक्तीपासूनचा घटनाक्रम

५. थकित देयक राहण्याची सविस्तर कारणमिमांसा

६. थकित देयकाची परिगणना केल्याची सेवापुस्तक प्रत

७. मा. न्यायालयाचे आदेशनुसार देयक अदा करण्यात येत असल्यास- प्रकरणी वेळोवेळी झालेले न्यायालयीन अदेश व त्यानुसार करण्यात आलेली कार्यवाही.

८. सेवा पुर्नस्थापीत केल्याने, थकीत देयक अदा करावे लागत असल्यास (सेवा समाप्तीचे विहीत पद्धतीने निर्गमित आदेश, सेवा पुर्नस्थापना व अनुषंगिक कागदपत्रे)

उपरोक्त प्रमाणे थकित देयक प्रस्ताांसोबत आवश्यक कागदपत्रे/अभिलेखे अनुक्रमे अधिक्षक, वेतन पथक व भ.नि.नि./ शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित केल्याच्या प्रर्तीसह शालार्थ २.० प्रणालीवर अपलोड करुन परिपूर्ण प्रस्ताव संचालनालयास करण्याची दक्षता घेण्यात यावी.

signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 21-08-2026 17:09:26

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रतः- १. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर

२) श्रीम. स्नेहा चुरी, अवर सचिव (टिएनटि-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुबई-३२


परिपत्रक पीडीएफ लींक 




Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27

Online Submission Of  Pending Supplementry Salary Bills In Shalaarth Pranali Year 2026-27

Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026 - 27

Online Submission Of  Pending Supplementry Salary Bills In Shalaarth System Year 2026-27

Online submission of outstanding salary payments in the Shalaarth system. Year 2026-27


क्र. शिसंमा/२०२६/टि-७/थकीत /ऑनलाईन / 1894257

दिनांक :-/०५/२०२६. 

12 MAY 2026

महत्वाचे परिपत्रक


विषय - थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७


संदर्भ-

१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिर्समा/२०२४/टि-७/शालार्थ/धकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.

४) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.

५) दिनांक ०७/०४/२०२६ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ३ व ४ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

सन २०२६-२७ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून आज दिनांक १२/०५/२०२६ पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र. तपशिल

१ संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरुन थकीत देयकासह माहिती भरावी. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी/अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन / तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२६-२७ मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोषागारात सादर न केलेली व मान्यता न मिळालेली देयके पुनश्च ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.

प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.

२. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी ( प्राथमिक/माध्यमिक) यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करणे. तथापि, ऑन लाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/बरिष्ठश्रेणी / न्यायालयीन आदेश / अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

२. विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र यापूर्वी दिलेले आहे. उपरोक्त क्रमांक १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

३. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संचालकाकडे सादर करणे तसेच उपरोक्त अ.क्र..१ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

१. विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील समितीचे मंजूरीस्तव शिफारसपत्र.

२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/बरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

३. विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र जोडावे. यापूर्वी दिले प्रमाणे४. न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरण वावतचे परिपत्रक दि.६/१/२०२३ नुसार सादर करावे.

४ विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंवित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना शासन निर्णय १५/७/२०१७ मधील सूचनानुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी शिक्षण संचालक यांचे स्तरावरुन देण्यात येईल.

५ संचालनालय स्तरावरुन शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील सूचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी / पुनर्विनियोजन/ सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करण्यात येईल.

६. वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करुन स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करण्यात येईल.

७ थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील परिशिष्ट अ प्रमाणे (सोबत जोडली) आहे.

८. संबंधित शाळांकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके अधीक्षक, वेतन पथक, प्राथमिक/माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी तपासून क्षेत्रिय स्तरावरील समितीच्या संयुक्त स्वाक्षरीच्या प्रमाणित अहवालासह (हार्ड कॉपी) संचालनालयास सादर करावी. संबंधित डिडिओ स्तरावर थकीत देयके प्रलंबित राहील्यास अथवा विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

९. जी थकित देयके सन २०२५-२६ या आर्थिक वर्ष अखेरीस ज्या स्तरावर अधिक्षक वेतन पथक/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर आहेत त्यास्तरावरुन विहीत Flow Chart प्रमाणे संचालनालयास सादर करावीत.

१०. सन २०२५-२६ अखेर जी थकित देयके संचालनालयाकडून मान्य करण्यात आलेली आहेत. तथापि ऑडर अपलोड नसल्यामुळे/बील जनरेट न झाल्यामुळे / बीडीएस न निघाल्यामुळे / कोषागाराने अमान्य केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास अदा होऊ शकली नाहीत. ती सर्व देयके विहीत Flow Chart प्रमाणे वर्ष २०२६-२७ मधील मान्यते करिता संचालनालयास सादर करावीत.

शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे भकीत देगकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये सादर कराने, प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुगार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये सादर करावा..

सन २०२६-२७ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे, त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI

Date: 12-05-2026 21:47:29

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक, प्राथमिक महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 12-05-2026

21:40:30

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१.

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. श्री विशाल लोहार, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई, यांनी वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सन २०२६-२७ थकीत देयके अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टेंब दिनांक १२/०५/२०२६ पासून उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच वेळोवेळी येणा-या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे.

परिशिष्ट अ


थकीत वेतन देयक विषय निहाय आवश्यक कागदपत्रे

विषय आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड सोबत जोडणेचे कागदपत्रे

Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27
परिशिष्ट अ

थकीत वेतन देयक विषय निहाय आवश्यक कागदपत्रे
अ. क्र. विषय आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड/गोयत जोडणेचे कागदपत्रे शेरा 



थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२६-२७ Thakit Vetan Deyak Shalarth Pranali Madhye Sadar Karne Babat San 2026-27


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon