DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kantrati Bharti Shasan Nirnay Radd

Kantrati Bharti Shasan Nirnay Radd

Contract Recruitment GR Cancelled १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय रद्द


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत.

कंत्राटी भरती शासन निर्णय रद्द अधिक्रमित

वाचाः-

१) शासन पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.३६२/टिएनटि-१, दि.०७.०७.२०२३. 

२) शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४. 

३) शासन पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.४१४/टिएनटि-१, दि.१५.०७.२०२४. 

४) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.३६६/टिएनटि-१, दि.०५.०९.२०२४. 

५) शासन निर्णय समक्रमांक, दि.२३.०९.२०२४. 

६) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती-

दु.ट/२०२५/३०९, दिनांक २०.०१.२०२५. 

प्रस्तावना:-

संदर्भ क्र. ५ येथील दि.२३.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डि.एड/ बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. सन २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक २०.०१.२०२५ रोजी प्रत्यक्षात सुरु झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्र.४ व संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

संदर्भ क्र.४ व ५ येथील शासन निर्णय या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत. 

२. संदर्भ क्र.४ व ५ येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल, तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही. 

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२१०१६५२४७३०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. 

शासन निर्णय पीडीएफ प्रत हवी असल्यास या ओळीला स्पर्श करा

उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२४/प्र.क्र.६६६/टिएनटि-१, मंत्रालय, मुंबई

दिनांक: १० फेब्रुवारी, २०२५. 

Local bodies Schools with Ten And less than Ten Students Confirmation of Government decision regarding appointment of qualified D.Ed., B.Ed. unemployed candidates on contract basis GR Cancelled

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon