DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kala Krida Sangank Shikshak Bharti Bahystrotvadvare कला शिक्षक क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता

Kala Krida Sangank Shikshak Bharti Bahystrotvadvare

कला शिक्षक क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता


कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता

दिनांक: १८ फेब्रुवारी, २०२५.

वाचाः -
१) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. भांखस २०१४/प्र.क्र.८२/भा-॥/उद्योग ४. दि.०१.१२.२०१६
२) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. पदनि-२०२२/प्र.क्र.१५/आ.पु.क., दि.२७.०४.२०२२.
३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. पदआ ३८१७/प्र.क्र.१३९/का-१५, दि.१६.११.२०२२.
४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.प्रशा २०२४/प्र.क्र.७८/का.२(२), ४८, दि.०२.०१.२०२५.

प्रस्तावना :-
आदिवासी विकास विभागाच्या १६ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रिय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे. सदरील शासन निर्णयातील आकृतीबंधात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाहयस्रोतांद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सुधारीत आकृतिबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांच्या सेवा बाहयस्रोतांद्वारे उपलब्ध करुन घेण्यासाठी GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
        शासन आदेश
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ येथील दिनांक ०२.०१.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची १४९७ पदे बाहयस्रोतांद्वारे भरण्याकरिता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रु.८१,०८,७५,०००/- (अक्षरी रुपये एक्याऐंशी कोटी, आठ लाख, पंच्यात्तर हजार रुपये मात्र) इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.कार्यालय पदाचे नाव पद संख्या 
१.    शासकीय आश्रमशाळा कला शिक्षक ४९९
२.    शासकीय आश्रमशाळा क्रिडा शिक्षक ४९९
३.    शासकीय आश्रमशाळा संगणक शिक्षक ४९९
एकूण  १४९७
कला शिक्षक क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता


२. प्रस्तुतची ई-निविदा प्रक्रिया राबवितांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1. उक्त पदे बाहयस्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने "शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका" याबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भा-॥ / उद्योग-४, दि. १ डिसेंबर, २०१६ मध्ये नमुद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे, तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपध्दतीचे पालन करण्यात यावे.
॥. उक्त पदे बाहयस्त्रोतांद्वारे भरण्याकरिता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
iii. सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई-निविदेस विहित पध्दतीने व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
iv. निविदा अंतिम करण्यापुर्वी निविदा पुर्व (Pre bid) बैठक घेण्यात यावी, जेणेकरून निविदाधारकांच्या निविदेसंदर्भातील अडचणी वेळीच निदर्शनास येवून त्याची त्वरीत सोडवणूक करता येईल.
v. प्रस्तुत ई-निविदेतील न्युनतम दरधारक (L-१) यांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १ डिसेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या "शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहीत केलेली कार्यपध्दती तसेच शासनाचे प्रचलित नियम व Central Vigilance Commission (CVC) यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात.
vi. व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर पात्र पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापुर्वी संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयास अनुसरुन खरेदीस शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग शासन आदेश क्रमांकः MTD-३६०२४/४/२०२५-MTD (Desk१५)
मंत्रालय, मुंबई
E-Tender for filling 1497 posts of Art Teacher, Sports Teacher and Computer Teacher in Government Ashram Schools of Tribal Development Department through Outsourcing Regarding granting administrative approval.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची १४९७ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याच्या ई-निविदेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon