DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Prajasttak Din Smarambha Guidelines GR

Prajasttak Din Smarambha Guidelines GR


Republic Day Celebration

India's 77th Republic Day Celebration - January 26, 2026.


भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ - २६ जानेवारी, २०२६.


दिनांक :- २१ जानेवारी, २०२६

शासन परिपत्रक :-

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० वा. च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सकाळी ९-१५ वाजता शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल.

३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे मा. पालकमंत्री / मा. मंत्री / मा. राज्यमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतीलः-

अ.क्र. जिल्ह्याचे नाव पालकमंत्री / मंत्री / राज्यमंत्री
१ )ठाणे श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री
२) पुणे श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उपमुख्यमंत्री
३) नागपूर श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
४) अहिल्यानगर श्री. राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
५) सांगली श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
६) नाशिक श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन
७) पालघर श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
८) जळगाव श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
९) अमरावती श्री. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
१०) यवतमाळ श्री. संजय प्रमिला दुलीचंद राठोड
११) मुंबई (शहर) श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा
१२) रत्नागिरी श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत
१३) धुळे श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
१४) जालना श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
१५) नांदेड श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे
१६) चंद्रपूर डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके
१७) सातारा श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
१८) मुंबई (उपनगर) अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार
१९) वाशिम श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
२०) लातूर श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
२१) सोलापूर श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे
२२) हिंगोली श्री. नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
२३) भंडारा श्री. संजय सुशिला वामन सावकारे
२४) छत्रपती संभाजीनगर श्री. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
२५) धाराशिव श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
२६) रायगड श्री. भरत विठाबाई मारुती गोगावले
२७) बुलढाणा श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
२८) सिंधुदुर्ग श्री. नितेश निलम नारायण राणे
२९) अकोला श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
३०) बीड श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
३१) कोल्हापूर श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
३२) गडचिरोली अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
३३) वर्धा डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
३४) परभणी श्रीमती मेघना दीपक साकोरे - बोर्डीकर
३५) गोंदिया श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक
३६) नंदूरबार श्री. योगेश ज्योती रामदास कदम

४. राष्ट्रध्वजवंदन करणारे मा. पालकमंत्री / मा. मंत्री / मा. राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजवंदन करावे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी राष्ट्रध्वजवंदन करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजवंदन समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

५. राष्ट्रध्वजाला वंदन करताना "राष्ट्रगीत" म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन "राज्यगीत" वाजविण्यात यावे. ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजवंदनाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

७. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.

८. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

९. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच आणिबाणीच्या कालावधीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्ती यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१०. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

११. दिवसभरात विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमांद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा / संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

१२. ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसंदर्भात आचारसंहिता लागू असल्यास त्या जिल्ह्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात :-

१) ध्वजवंदनाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.
२) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करण्यात येऊ नये.
३) मा. पालकमंत्री / मंत्री / राज्यमंत्री यांचा भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तुत्व या पुरतेच मर्यादित असावा. बलिदान दिलेल्या हुतात्मांचा तसेच देशाचा गौरव यासंदर्भातील भाषणे असावीत. कोणत्याही राजकीय स्वरुपाची भाषणे नसावीत. 

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०१२११७०८२४३३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२६/प्र.क्र.०३/राशि-१, राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. 

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ - २६ जानेवारी, २०२६.
दिनांक :- २१ जानेवारी, २०२६
शासन परिपत्रक

Prajasttak Din 2025  Smarambha Guidelines GR

Prajasttak Din Smarambha Margdarshak Suchana Shasan Nirany
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन
समारंभ - दि. २६ जानेवारी, २०२५,
दिनांक १८ जानेवारी, २०२५


शासन परिपत्रक

दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

२. मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सकाळी ९-१५ वाजता शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल.

३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे मा. मंत्री /

मा. राज्यमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील :-

प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा समारंभ कार्यक्रम

Republic Day Flag Hoisting Ceremony

४. राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री मा. राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

५. राष्ट्रध्वजाला वंदन करताना "राष्ट्रगीत" म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन "राज्यगीत" वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/ (ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

७. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी.

८. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित रहाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

९. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१०. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

११. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे :- वृक्षारोपण, आंतर शालेय आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेन्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोडिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

१२. काही ठराविक जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यातः-

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये.

क) मा. मंत्री / मा. राज्यमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०११८२१००५६६३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


Circular pdf Copy LINK


उप सचिव, महाराष्ट्र शासन


प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम. २६ जानेवारी २०२५


बृहन्मुंबईसाठी

सकाळी ५,०० महत्वाच्या ठिकाणी सनई चौघडा वादन

सकाळी ८.०० शहरांच्या सर्व भागात, सर्व इमारतींवर, शाळांवर व महाविद्यालयांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

* सकाळी ९.१५ मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन.

*सकाळी १०,०० शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी विविध क्षेत्रातील घटकांचे संचलन करणे, शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थानी "प्रजासत्ताक महोत्सव" या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करणे, तसेच इतर संस्थानी आपले विविधतापूर्ण देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृर्तीसाठी कार्यक्रम आयोजित करावेत.

*संध्याकाळी सोयीनुसार देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

विभागीय व जिल्हा मुख्यालयांसाठी

सकाळी ८.०० प्रत्येक भागातील शाळा, महाविद्यालये व इतर जास्तीत जास्त इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणे.

*सकाळी १०.०० शहरांच्या जास्तीत जास्त भागाचा अंतर्भाव करुन पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना व रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त संचलन करणे, शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थानी "प्रजासत्ताक महोत्सव" या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करणे, तसेच इतर संस्थानी आपले विविधतापूर्ण देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृर्तीसाठी कार्यक्रम आयोजित करावेत.

* संध्याकाळी सोयीनुसार देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.

ग्रामीण विभागांसाठी

सकाळी ६.०० गावाची साफ सफाई.

सकाळी ८.०० - चावड्या, सार्वजनिक कार्यालये, दवाखाने, वाचनालये, शाळा, खाजगी इमारत अशा गावातील जास्तीत जास्त ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

* अशी खूण असलेले कार्यक्रम हे शासकीय समारंभ आहेत. इतर कार्यक्रम प्रजासत्ताक दिन समारंभाच्या नागरीकांच्या समितीने अशासकीय प्रतिनिधिक संस्थांच्या मदतीने करावयाचे कार्यक्रम आहेत.

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन

समारंभ - दि. २६ जानेवारी, २०२५,

राज्य पातळी वरील कार्यक्रम 

विभाग पातळी वरील कार्यक्रम 

जिल्हा पातळी वरील कार्यक्रम 

शाळा पातळी वरील कार्यक्रम 

ग्राम पातळी वरील कार्यक्रम 

राज्य, जिल्हा, तालुका, शाळा स्तरावर, ध्वजारोहण झेंडावंदन कोणी करावे

ग्रामपंचायत स्तरावर 

राज्य, जिल्हा, तालुका, शाळा, ग्राम पंचायत स्तरावर ध्वजारोहण, झेंडावंदन कोणी करावे ? 
वाचा या ओळीला स्पर्श करून 

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२५/प्र.क्र.०३/राशि-१, सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक १८ जानेवारी, २०२५


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon