DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Janma Mrutyu Nandini kayda sudharna

Janma Mrutyu Nandini kayda sudharna

जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत.


Janma Mrutyu Nandini 1969 kayda sudharna 2023

जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत.

Registration of Births Deaths Act New Update 
Amendment 2023 of the Registration of Births and Deaths Act 1969

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
मुंबई

क्रमांक: संकीर्ण २०२५/प्र.क्र. ०३/ई-१अ

दिनांक-२१ जानेवारी, २०२५


विषयः- जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत.

संदर्भः- १. भारत शासन राजपत्र दि.११ ऑगस्ट, २०२३.

२. गृह विभाग, महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. १० सप्टेंबर, २०२३.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयी संदर्भिय भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींची चौकशी करणेकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (SIT) स्थापना करण्यात आलेली आहे. सबब उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये, ही विनंती.

आपला,

या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता 



(महेश घरूडकर) उप सचिव, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon