DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Diploma in Guidance Counseling Course Registration Link


Diploma in Guidance and Counseling Certificate Registration Link
NCERT Announce

विषयः Guidance and Counselling (DCGC-२०२५) या एक वर्षीय प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रम

    उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळा व संबंधित शैक्षणिक संस्थेत तज्ञ समुपदेशक तयार करण्यासाठी अनेक वर्षापासून मार्गदर्शन व समुपदेशन हा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जात आहे. सदर अभ्यासक्रम NCERT मार्फत शालेय संस्थेमध्ये तज्ञ सनुपदेशक उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व शालेय परीसंस्थेशी संबंधित व्यक्तीसाठी आहे. सदर अभ्यासक्रन हा दूरस्थ व प्रत्यक्ष पद्धतीने राबविला जातो. यात तीन टप्प्यांचा समावेश आहे नार्गदर्शित स्वयंअध्ययन (६ नहिने दूरस्थ - अध्ययन), अभ्यासकेंद्रावर संपर्क कार्यक्रन (३ नहिने) आणि अंतरवासिता (३ महिने, अध्ययनार्थीच्या स्वजिल्ह्यात किंवा कार्यक्षेत्रामध्ये). सदर अभ्यासक्रम प्रत्येक वर्षी जानेवारी नहिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो.यासाठी संदर्भीय पत्रानुसार राज्यातील किमान २० व्यक्तींनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. संबंधित पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी संबंधित वाव शिक्षण क्षेत्रातील या संबंधात कार्य करू इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्तींच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.
    यासाठीची घोषणा NCERT च्या www.ncert.nic.in या साईटवर लवकरच करण्यात येणार आहे असे संदर्भान्चये नमूद करण्यात आले आहे. या साठीची निवड चाचणी व मुलाखत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. यासाठी संभाव्य अध्ययनार्थीची यादी NCERT ला प्राप्त झाल्यास त्यासंबंधात कार्यवाही करण्यासाठी NCERT ला पुढील कार्यवाही करणे सुकर होऊ शकते.
या प्रमाणपत्र पदविकेसाठी शासकीय, शासनमान्य विभागातील व्यक्तीसाठी नाममात्र रु ६०००/- इतकी फी आहे. यासाठी सदर व्यक्तींनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. 

१. अध्ययनार्थी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर या क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असला पाहिजे.
२. अध्ययनार्थी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच्या आवश्यक वावी पूर्ण करण्यासाठी तसेच
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभ्यासकेंद्र येथे प्रवास करणे यासारख्या शारीरिक आरोग्य तसेच अनुषंगिक सर्व अटीची पूर्तता करण्यास सक्षम असला पाहिजे.
३. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी असल्याने अध्ययनार्थीला इंग्रजी भाषेचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे.
४. अध्ययनार्थीची १० वर्षे सेवा बाकी असणे आवश्यक आहे.
५. अध्ययनार्थीने हा अभ्यासक्रम यापूर्वी केला असू नये.
६. केवळ अभ्यासक्रमाचे शुल्क रुपये ६०००/असून इतर अनुषंगिक बाबी उदा. प्रवास खर्च, अभ्यासकेंद्र येथे राहणे व तत्संबंधित सर्व अध्ययनार्थीने करण्याची तयारी असली पाहिजे.
७. सदर अध्ययनार्थीला ३ महिने अभ्यासकेंद्र येथे अध्ययन करणे अपेक्षित असल्याने संबंधित संस्थेची परवानगी आवश्यक आहे.
 
Circular pdf Copy LINK

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद महाराष्ट्र, पुणे
DCGC - 2025

      Admission Announcement LINK

      Admission Brief LINK

      Information Brochure LINK
     
       Online Application Form  LINK

One Year Certificate Diploma in Guidance and Counseling (DCGC 2025). Curriculum

Diploma Course in Guidance and Counselling

Admission Announcement NCERT

Diploma Course in Guidance and Counselling - 2025

NCERT announces a one-year Diploma course for training of professionals in guidance and counselling, combining distance and face-to-face modes. The course aims at enhancing the skills and competencies of teachers to promote holistic development of pupils and handle their academic, socio-emotional, and ethical problems. The course is open to teachers, teacher educators, school administrators and untrained guidance personnel from India. The course will be transacted in three phases, i.e. distance (six months; January June, 2025), face-to-face contact programme at respective study centres (three months; July September, 2025), and internship in home town (three months; October December, 2025). Admission to eligible candidates will be offered at DEPFE, NIE, New Delhi and Regional Institutes of Education at Ajmer, Bhopal, Bhubaneswar, Mysuru and Shillong. Maximum no. of seats at each centre will be 50. Government deputed candidates will be preferred. Advance copy will be considered for screening of applications. NCERT's decision will be final in matters of admission. For Online Application Form and other details about the course, please visit our webpage www.ncert.nic.in Last date for submission of online application form is 05th November, 2024.

All applications should be submitted only online and no applications will be received in the department or on e-mail. The applications will be sorted and duly sent to regional study centres as per the rules of the Diploma.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपन/व्यनावसमुवि/RIE Bhopal /२०२४-२५/०५१९९
दिः २४/१०/२०२४
प्रति.
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) जिल्हा परिषद, (सर्व)
संदर्भ: RIE भोपाळ यांचे प्राप्त पत्र क्र. F.RIEB/DEE/PAC-२३.३६/२०२४/३१७.दि १८/१०/२०२४
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon