DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Co Operative Societies Election Update


सहकारी संस्था निवडणूक 
Sahkari Sanstha Nivadnuk 


दिनांक :- ०७ ऑक्टोबर, २०२४.


          आदेश

ज्याअर्थी राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३कब मधील तरतुदी नुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते,

ज्याअर्थी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. ०४.१०.२०२४ रोजीच्या पत्राव्दारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील २९,४२९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

ज्याअर्थी जून, २०२४ मध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाच्या दिनांक २० जून, २०२४ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

ज्याअर्थी, सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुक पुर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत पुढे ढकलणे उचित होईल अशी शासनाची धारणा आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३कक मधील तरतुदीनुसार राज्य विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शासनास अधिकार आहे.

त्याअर्थी, निवडणूकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३कक मध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनास असलेल्या अधिकारानुसार, राज्यातील २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी मा. सर्वोच्च मा. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष / उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४१००७१५२८०३२८०४ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(अनिल ज. चौधरी) 
अवर सचिव, 
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
क्रमांक :- संकीर्ण १९२४/प्र.क्र.१४१/१३स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई
संदर्भ :- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचे जा.क्र. रासनिप्रा/ कक्ष-११/ निवडणूक सद्यस्थितीबाबत / ४८०३/२०२४, दिनांक ०४.१०.२०२४ रोजीचे पत्र.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon