DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shasakiya Rekhakala Pariksha Hall Ticket


महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State Board of Art Education, Mumbai

क्रमांकः कशिमं/शारेप-२०२४/२५२

दिनांक ०२.०९.२०२४

प्रति,
मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख, 
शासकीय रेखाकला परीक्षा-२०२४
Shasakiya Rekhakala Pariksha Hall Ticket

विषय :- शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ प्रवेशपत्र (HALL TICKET) प्रिंटआऊट काढून केंद्रप्रमुख यांच्या सहीशिक्यानिशी. विद्यार्थ्यांना वितरित करण्याबाबत
 
संदर्भ- १) परिपत्रक क्र. कशिमं/शारेप-२०२४/५७, दिनांक १६.०७.२०२४
२) परिपत्रक क्र. कशिमं/शारेप-२०२४/२३४, दिनांक १४.०८.२०२४
३) कशिमं/शारेप-२०२४/२६५ दि.३०.०८.२०२४

    शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चे वेळापत्रक तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी, परीक्षा शुल्क भरणा कालावधी इ. बाबत संदर्भिय पत्र/परिपत्रकानुसार कळविण्यात आले होते.
    शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची नांवनोदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (GENERAL REGISTER) नावाप्रमाणे अचूक नांवनोंदणी करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील परिपत्रकानुसार कळविण्यांत आले आहे. तथापी आपल्या केंद्रावर एकाच विद्याथ्यांची दोन्ही परीक्षेसाठी नांवनोदणी केली असल्यास दोन्ही परीक्षा एकाच वर्षी देता येत नसल्यामुळे दोन्ही पैकी एका परीक्षेची ऑनलाईन नोंदणी रदद करावी.
🙋
चित्रकला परीक्षा वेळापत्रक जाणून घेण्यासाठी 


एखाद्या विद्यार्थ्यांची एलिमेंटरी ऐवजी इंटरमिजिएट/इंटरमिजिएट ऐवजी एलिमेंटरी परीक्षेकरिता नोंदणी केली असल्यास अशा प्रकरणी योग्य त्या बदलासह ऑनलाईन दुरुस्ती करण्यात यावी, ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे प्रवेशपत्र निर्गमित होईल, प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांस परिक्षेस बसण्याची परवानगी देऊ नये. अशा प्रकारचे प्रकरण उद्भवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुख यांची राहील.
    संदर्भिय क्र. ३ वरील पत्रात नमूद केल्यानुसार दिनांक ३१/८/२०२४ पर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) दिनांक ०२/९/२०२४ (म.ऊ) पासून केंद्राच्या लॉग-इनवर उपल्ब्ध होतील. सदर प्रवेशपत्र (HALL TICKET PRINT OUT) प्रिंटआऊट काढून केंद्रप्रमुख यांच्या सहीशिक्क्यानिशी विद्यार्थ्यांना वितरीत करावीत.
    संदर्भिय पत्र / परीपत्रकानुसार परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांची अद्याप ऑनलाईन नांवनोंदणी केली गेली नाही असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांची अचूक ऑनलाईन नांव नोंदणी व परीक्षा शुल्क भरणा करण्याकरिता दिनांक ०८/०९/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यांत येत आहे. याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/कला शिक्षक/विद्यार्थी/पालक यांना अवगत करुन वरील कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
संचालक, 

CIRCULAR PDF COPY LINK

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.
Elementary and intermediate drawing grades Examination 2024 Government drawing Shaskiy Rekhakala Pariksha Hall Ticket Download Link
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon