Not Binding Employees Order On WhatsApp
व्हॉट्सअॅपवरून अधिकाऱ्यांकडून वेळी-अवेळी सतत दिले जाणारे आदेश आणि केल्या जाणाऱ्या सूचनांमुळे राज्यभरातील शिक्षकांसह सर्व शासकीय-अशासकीय कर्मचारी कमालीचे त्रासले गेलेले असतानाच आता व्हॉट्सअॅपवरून आदेश देण्याबाबत राज्य शासनाने कोणत्याही प्रकारचे परिपत्रक जारी केलेले नसल्याने असे आदेश वैध नसल्याने ते कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बंधनकारक नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने केला आहे.
माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाल्याने शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
दिनांक:- ४ डिसेंबर, २०१७.
विषय:-माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मिळणेबाबत.
महोदय,
आपला माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत पाठविलेला ऑनलाईन अर्ज GADEP/R/२०१७/६०४३७ हा दि.१७/१०/२०१७ रोजी या कार्यासनास प्राप्त झाला आहे.
२. सदर अर्जाद्वारे आपण अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना व्हॉटसअॅप किंवा सोशल मीडीयाद्वारा दिलेले कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबतचे धोरण किंवा परिपत्रक ची प्रत मिळावी अशी मागणी केली आहे. अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शासनाचे आदेश/शासन निर्णय व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडीयावर प्रसिध्द करण्याबाबत तसेच अशाप्रकारचे सोशल मिडीयावरचे कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबत या कार्यासनाचे कोणतेही धोरण किंवा आदेश नाहीत.शासन आदेश / अधिसूचना / शासन निर्णय / परिपत्रक हे राज्य शासनाच्या http://intranet.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतात.
३. उपरोक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास आपण सदर पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत श्री.ध.मा. कानेड उपसचिव तथा प्रथम अपिलीय अधिकारी (कार्यासन १८), सामान्य प्रशासन विभाग, दालन क्र. ६२५, ६ वा मजला, मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०००३२ (दूरध्वनी क्र. ०२२-२२०२५९३१) येथे अपील दाखल करू शकता.
आपली
(समृध्दी वि. अनगोळकर)
आपली
(समृध्दी वि. अनगोळकर)
जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग
सूचना का अधिकार
RIGHT TO INFORMAT
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (विस्तार), कक्ष क्र. ६३१, मुंबई
क्र.: माअअ २०१७/प्र.क्र.१९६/१८(२. व का.)
प्रति,
श्री. योगेश महादेव पाखले
ई-मेल द्वारा देय.
प्रत,
सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन-१८, निवडनस्ती.
There is no policy or mandate of this office to oblige employees to follow office orders on social media
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon