DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

German Language Training for Teachers

German Language Training for Teachers

German Language Free Training Scheme for Teachers Registration Link

German Language Free Training Scheme for Teachers Registration Link
German language training classes for teachers Google link to enroll teachers free of charge through Government

शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु  शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी गुगल लिंक

विषय: जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गात नाव नोंदणी करण्यास आवाहन करणे बाबत

संदर्भ:
१) महाराष्ट्र शासन व बाडेन बुटेनबर्ग राज्य जर्मनी यांचे दरम्यान दि. २०/२/२०२४ रोजी झालेल्या सामंजस्य करार
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. कौशल्य २०२४/प्र.क्र.५१/एसडी-६. दि.११ जुलै, २०२४.
३) ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे दरम्यान दि. ०१/०८/२०२४ रोजी झालेला सामंजस्य करार
४) मा.संचालक,रा.शै.सं व प्र.प.पूणे यांचे पत्र जा.क्र.03826 दि.13.08.2024

German Language Training for Teachers

    उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार दिनांक २५/२/२०२४ रोजी केला आहे. तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. ११ जुलै, २०२४ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये दिनांक ०१/०८/२०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 
ALSO RAED 

German Language Free Training Scheme for Students In own District GR

    जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे १०००० विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे २०० प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन MA in जर्मन, ग्योथे इन्स्टिट्यूट यांचेद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1,A2,B1,B2,C1,C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी

REGISTAR NOW LINK SUBMIT

  

ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे.
उपरोक्त लिंक वर शिक्षक नावनोंदणी करीत आहेत तथापि जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने आपल्या विभागातील / जिल्ह्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांना उपरोक्त लिंकवर नाव नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात यावे व प्रसिद्धी देण्यात यावी.

Previous
Next Post »

3 comments

Click here for comments
Unknown
admin
August 21, 2024 at 8:41 PM ×

Nice, Jarman language is necessary for future life

Reply
avatar
August 23, 2024 at 8:59 PM ×

Sir शासनाला फक्त शासकीय कर्मचारीच पुढे न्यायचे आहेत का ? हा प्रश्न उठतो...बराच ग्रामीण भाग आहे.तिथं आमची गरीब मुले आश्रमात शिकत असतात..त्यांच्या भविष्याची काहीच चिंता नाही सरकारला.खाजगी अनुदानित ,विनाअनुदानित आहेत. तिथं ही मुलं शिकतात..हे सरकार कश्याला विसरते..

Reply
avatar
Unknown
admin
August 24, 2024 at 7:08 PM ×

It's amazing concept

Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon