Anukampa Karmchari Juni Pension Circular
दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४.
विषयः- जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत.
संदर्भ :-१) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४,
दि.०२/०२/२०२४ २) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे पत्र क्र. मुअ (पुणे)/ आस्था-१/६६२३/२०२४, दि.२५/०७/२०२४
अनुकंपा तत्वावर भरती होणेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे अनुकंपा नियुक्ती मागणीचे अर्ज हे दिनांक ०१/११/२००५ पूर्वीचे असून, त्यांना नियुक्त्या ह्या ५ ते ७ वर्षानंतर म्हणजेच दि.०१/११/२००५ नंतरच मिळालेल्या आहेत असे कर्मचारी वित्त विभागाच्या दि.०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विविध क्षेत्रिय कार्यालयात विनंती अर्ज करीत आहेत व त्यानुषंगाने क्षेत्रिय कार्यालयांकडून शासनाकडे मार्गदर्शन मिळण्याची विनंती करण्यात येत आहे. अशाच प्रकारची मागणीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावावर वित्त विभागाकडून पुढीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले आहेतः-
"वित्त विभागाचा दि.०२/०२/२०२४ चा शासन निर्णय दि.०१/११/२००५ पूर्वी ज्या पदाकरिता
जाहिरात प्रसिध्द झाली आहे तथापि त्यांची नियुक्ती दि.०१/११/२००५ नंतर झाली आहे या अटीच्या पूर्तता करणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांच्याबाबतीत जाहिरात प्रसिध्द होत नाही. जशी पदे उपलब्ध होतात त्याप्रमाणे अनुकंपा यादीतील कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे दि.०१/११/२००५ पूर्वी शासन विहित अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील पात्र तथापि दि.०१/११/२००५ नंतर नियुक्त उमेदवारांना सद्य:स्थितीत सदर शासन निर्णयातील तरतूदी लागू होत नाहीत."
२. वित्त विभागाच्या उपरोक्त अभिप्रायानुसार सदर कर्मचाऱ्यांचे विनंतीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत:-
निवडन (सेवा-४ कार्यासन)
कार्यासन अधिकारी, प्रशा-१, प्रशा-२, प्रशा-३, प्रशा-४, सेवा-१, सेवा-२, सेवा-३, रो.आ.-१, रो.आ.-२, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय,
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई
क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९५/सेवा-४
प्रति,
१) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (मुंबई/कोंकण/पुणे/नाशिक/छत्रपती संभाजीनगर /नांदेड/अमरावती/ नागपूर)
२) मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (सा.बां), नवी मुंबई.
३) मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई
४) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम परिमंडळे (मुंबई/पुणे/नाशिक/नांदेड /छत्रपती संभाजीनगर /अमरावती/नागपूर)
५) अधीक्षक अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम मंडळे (मुंबई/पुणे/ नांदेड/नागपूर)
६) अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), नवी मुंबई
७) संचालक, उपवने व उद्याने, मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon