DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Action Against Unauthorized Schools Circular

Action Against Unauthorized Schools in the state

Action Against Unauthorized Schools Circular GR


महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय

माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे

महत्त्वाचे

क्रःशिसंमा-24/(अं-02)/ अधिकृत शाळा/एम-1/3722 दि. 10 जुलै, 2024 

10 JUL 2024


प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक, 

सर्व विभाग.


विषय : राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करणेबाबत


संदर्भ:

1. शासन निर्णय क्रःसंकीर्ण-2020/प्र.क्र.43/20/एस.एम.2, दि. 10/11/2020..

2. शासन निर्णय क्रः एसएफएस-1023/प्र.क्र. 928/ एसएम-2, दि. 18/12/2023.

3. शिक्षण आयुक्तालय, म.रा. पुणे यांचे पत्र क्रःक/टे.क्र.106 प्राथ/अनधिकृत शाहा/2024/2716, दि.18/04/2024.

4. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 2398, दि. 02/05/2024,

5. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 3239, दि.21/06/2024.

6. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 3424, 

दि. 01/07/2024.


वरील विषयाबाबत या कार्यालयाच्या संदर्भीय पत्रान्वये शासन निर्णय दि.18/12/2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरु झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तीशः जबाबदार धरुन संबंधित शिक्षणाधिकारी यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव या कार्यालयास सादर करणेबाबत आपणांस कळविण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनांव्दारा संचालित सर्व मंडळाशी संलग्न (SSC, CBSE, ICSE, IB, IGCSE etc) असणाऱ्या शाळांनी त्यांच्या शाळेच्या फलकावर किंवा दर्शनी भागात शासन मान्यता आदेश क्रमांक, युडायस क्रमांक व अन्य परीक्षा मंडळाशी संलग्नता प्रमाणपत्र क्रमांक लावण्याबाबत आपले स्तरावरुन निर्देश देण्याबाबतही आपणांस कळविण्यात आलेले आहे.

🙋

शाळेच्या दर्शनी भागात असाव्यात ह्या गोष्टी लिहिलेल्या 

👆👆👆👆👆

तथापि, शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द झाली नसल्याचे तसेच अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याबाबतचे वृत्त काही दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेले आहे. या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आपले विभागात अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी प्रसिध्द करुन सदरची यादी आपले कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. तसेच सदरची यादी आपले कार्यक्षेत्रातील मुख्य चौक, रस्ते इ.ठिकाणी सर्व नागरिकांना सुस्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावण्यात यावी. तसेच अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द न करणाऱ्या/अनधिकृत शाळांवर कारवाई न करणाऱ्या संबंधित शिक्षणाधिकारी यांचेविरुध्द महाराष्ट्र नागरी सवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदी व संदर्भ क्र.2, दि.18/12/2023 च्या शासन निर्णयानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.

वरीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल दि. 25/07/2024 पर्यंत या कार्यालयास सादर करावा.


( डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत :

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांना माहितीस्तव सविनय सादर.

2. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.

3. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व यांना आवश्यक त्या तात्काळ कार्यवाहीस्तव.

4. शिक्षण निरीक्षक (उ/प/द) बृहन्मुंबई यांना आवश्यक त्या तात्काळ कार्यवाहीस्तव.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon