DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Celebration of International Yoga Day

Celebration of International Yoga Day

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/celebration-of-international-yoga-day.html
Celebration of 21st June 2024 as the 10th International Day of Yoga

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. क्रीयुसे/अयोदि/२०२४-२५/का-१०/५७९

दि. 10 JUN 2024

प्रत्ति,

३. विभागीयच उपसंचालक (सर्व)

४. जिल्हा क्रीडा अधिकारी (सर्व) महाराष्ट्र राज्य.

विषय :- दि. २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत.

Celebration of 21st June 2024 as the 10th International Day of Yoga

संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. संकीर्ण ३०२६/प्र.क्र.९६/क्रीयुसे१/ दि.८ जून, २०१६

शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुक्त राष्ट्रसंघाने "२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळाला जोडल्या जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनाचे पालन करुन जिल्हयामध्ये
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा च्या संयुक्त विद्यामाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी खालील सुचनाचे पालन करण्यात यावे.

१. जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने योग दिनाचे आयोजन करण्यात यावे. 

२. शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन सी सी नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये सदर योग दिन साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळामध्ये सदर दि नाचे आयोजन करण्यात यावे. 

हेही वाचाल
वाचण्यासाठी वरील वरील ओळीला स्पर्श करा
४. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणा-या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यांची बैठक आयोजित करुन त्यांचे मार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात यावे. 

५. मुख्य कार्यक्रमामध्ये मा. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नामांकित खेळाडू, नागरीक यांना आंमत्रित करण्यात यावे.
६. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे.

७. दिनांक २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वीरित्या आयोजन संपन्न झालेनंतर त्याचा सविस्तर अहवाल क्रीडा संचालनालयास सादर करण्यात यावा. पेपर कात्रणे, योगा कार्यक्रमांचे करण्यात आलेले नियोजन, निश्चित केलेली स्थळे, फोटो, सहभागी युवक, युवती, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक इत्यांदी संख्या आंतरराष्ट्रीय योग दिनांचे आयोजन पुर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दु. ३.०० वाजेपर्यंत कार्यासन १० च्या

ईमेल email ✉️ 
वर पाठविण्यात यावी.
सुधीर मोरे
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon