DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Special Leave

Local Holiday Sthanik Sutti 


महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई

क्रमांकः आविवि-२०२०/प्र.क्र.१००/का.०५

दिनांक :- ०८ ऑगस्ट, २०२४

प्रति,
१. विभागीय आयुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर/औरंगाबाद/पुणे/कोकण २. जिल्हाधिकारी, नंदुरबार/नाशिक/धुळे/जळगाव/ठाणे/पालघर/रायगड/पुणे/नांदेड/हिंगोली/अमरावती/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/यवतमाळ/भंडारा

विषय :- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.

संदर्भ :- 
१) शासन निर्णय राजकीय व सेवा विभाग क्र.पी-१३-दोन-बी, दिनांक १६/०१/१९५८
२) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.८९/जपुक (२९) दि.०७.०८.२०२४

महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने स्थानिक सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा.

आपला,

(गोविंद साबने)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,
उप सचिव (जपुक-२९), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.


Also Read 👇 


विशेष नैमित्तीक रजा मंजूर

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

क्रमांक : वीआयई-२०२४/प्र. क्र.८०३/२४/३३ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १३ जून, २०२४

प्रति,

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग व मुंबई पदवीधर मतदारसंघ. मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ.

विषय :- २ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२४ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याबाबत....

महोदय,

भारत निवडणूक आयोगाच्या दि.२४ मे, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये कोकण विभाग व मुंबई या पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहोर केलेला आहे. सदर निवडणुकीचे मतदान दिनांक २६ जून, २०२४ (बुधवार) रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० पर्यंत व मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ (सोमवार) रोजी होणार आहे.

२. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ वी नुसार लोकसभा / विधानसभा निवडण् मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. मात्र, विधानपरिषद शिक्षक / ९

मतदार संघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क घजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२३.०६.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर केलेली आहे. सदरचा शासन निर्णय या कार्यालयाच्या 



 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदरची रजा हो त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

3. उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करुन आपल्या स्तरावरुन याबायोस स्थानिक वृत्तपत्राव्दारे तसेच दूरदर्शन व आकाशवाणी इत्यादी प्रसारमाध्यमांव्दारे व्यापक प्रसिद्धी देण्यात याची. ही विनंती.

आपला,

(म. रा. पोरकर)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य

हे ही वाचा 




लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ करिता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण २०२४/प्र.क्र.६७/कामगार-९ मंत्रालय, 
मुंबई ४०० ०३२ 

दिनांक: ०५ एप्रिल, २०२४

संदर्भ: १. मूख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. जीईएन-२०२४/प्र.क्र.३४६/२४/३३. दि.२३ मार्च, २०२४.

२. भारत निवडणूक आयोगाचे यांचे क्र.ECI/PN/२३/२०२४, दि.१६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिध्द्धीपत्रक, ३. भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४६४/L&०/२०२४/EPS, दि.२१ मार्च, २०२४.

शासन परिपत्रक :-

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किया सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

२. भारत निवडणूक आयोगाने दि.१६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान राज्यात परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दि.१९ एप्रिल, २०२४, दि.२६ एप्रिल, २०२४, दि.०७ मे, २०२४, दि.१३ मे २०२४ व दि.२० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-

॥ राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

11) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने

इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खारागृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) ॥ अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल

तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण २०२४/प्र.क्र.६७/कामगार-९

IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल,

४. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोगाचे यांचे क्र.ECI/PN/२३/२०२४, दि. १६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्र.४६४/६०/२०२४/EPS, दि. २१ मार्च, २०२४ रोजीच्या पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या  स्पर्श करा या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०४०५१४३४२२९२१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल कापडणीस)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत-परिशिष्ट-१ व २.

प्रत - उपरोक्त परिपत्रक सर्व संबंधित आस्थापनांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह अग्रेषित,



RNI No. MAHBIL/2009/31745

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक १८(४)]

बुधवार, एप्रिल ३, २०२४/चैत्र १४, शके १९४६

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, 
मुंबई ४०००३२, 
दिनांक ०३ एप्रिल, २०२४.

अधिसूचना

क्रमांक सार्वसु-१०२४/प्र.क्र. ३३/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रांक ३९/१/६८-जेयूडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन बाद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शविलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे:-

अ.क्र मतदानाचा वार व दिनांक       लोकसभा मतदार संघाचा क्रमांक व नाव

१. शुक्रवार, दि. १९ एप्रिल, २०२४    ९-रामटेक, १०-नागपूर, ११-भंडारा-गोंदिया, १२-गडचिरोली-चिमूर, १३-चंद्रपूर.    

२. शुक्रवार, दि. २६ एप्रिल, २०२४    ५-बुलडाणा, ६- अकोला, ७-अमरावती, ८- वर्धा, १४-यवतमाळ-वाशिम, १५-                                                        हिंगोली, १६-नांदेड, १७-परभणी.

३. मंगळवार, दि. ०७ मे, २०२४        ३२-रायगड, ३५-बारामती, ४०-उस्मानाबाद, ४१-लातुर, ४२-सोलापूर, ४३                                                             माढा, ४४-सांगली, ४५-सातारा, ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ४७-कोल्हापूर व ४८-                                                        हातकणंगले

४. सोमवार, दि. १३ में, २०२४           १-नंदुरबार, ३-जळगांव, ४-रावेर, १८-जालना, १९-औरंगाबाद, ३३- मावळ,                                                         ३४-पुणे, ३६-शिरुर, ३७ अहमदनगर, ३८-शिर्डी व ३९-बीड.

५. सोमवार, दि. २० मे, २०२४         २-धुळे, २०-दिंडोरी, २१-नाशिक, २२-पालघर, २३-भिवंडी, २४- कल्याण, २५                                                       ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७-मुंबई उत्तर-पश्चिम, २८ मुंबई उत्तर-पूर्व, २९ मुंबई                                                       उत्तर-मध्य, ३०-मुंबई दक्षिण-मध्य व ३१-मुंबई दक्षिण


(१) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उप-विभाग, एप्रिल ३, २०२४/ चैत्र १४, शके १९४६

२. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांनादेखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील.

३. सदर अधिसूचनाची माहिती व जनसंपर्क विभाग यांनी वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रो. दि. कदम-पाटील, 
शासनाच्या उप सचिव,

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उप-विभाग, 
एप्रिल ३, २०२४/ चैत्र १४, शके १९४६

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated 3rd April 2024.

NOTIFICATION

No. PHD-1024/C.R.33/JAPUK (XXIX). In exercise of the powers of Central Government under section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 (26 of 1881) entrusted to it by the Government of India, Ministry of Home Affairs vide its Notification No.39/1/68/JUdl-III, dated the 8th May 1968, the Government of Maharashtra hereby declares Public Holidays on account of General Election of 2024 in the concerned Parliamentary Constituencies indicated in the Schedule as below :-

Sr.No. Date of Polling           Serial No. and name of the Parliamentary Constituency

1. Friday, 19th April, 2024     9-Ramtek, 10-Nagpur, 11-Bhandara-Gondiya, 12-Gadchiroli-chimur, 13-                                                   Chandrapur.


2. Friday, 26th April, 2024      5-Buldhana, 6- Akola, 7-Amravati 8- Wardha, 14-Yavatmal-Washim, 15-                                                   Hingoli, 16-Nanded, 17-Parbhani.

3. Tuesday, 7th May, 2024      32-Raigad, 35-Baramati, 40-Osamanbad, 41-Latur, 42-Solapur, 43-                                                          Madha, 44-Sangli, 45-Satara, 46-Ratnagiri-Shindhudurg, 47-Kolhapur,                                                    48-Hatkanangle.
  

4. Monday, 13th May, 2024    1-Nandurbar, 3-Jalgaon, 4-Raver, 18-Jalna, 19-Aurangabad, 33-Maval,                                                    34-Pune, 36-Shirur, 37-Ahmednager, 38-Shirdi, 39-Beed.

5. Monday, 20th May, 2024     2-Dhule, 20-Dindori, 21-Nashik, 22-Palghar, 23-Bhiwandi, 24-Kalyan,                                                     25-Thane, 26-Mumbai North, 27-Mumbai North West, 28-Mumbai                                                           North East, 29-Mumbai North Central, 30-Mumbai South Central, 31-                                                     Mumbai South.

2. The said public holiday will also apply and be available to the registered voters of the poll- bound areas even if they are working outside the territorial limits of such areas, notwithstanding whether or not such voters belong to Central or State Government Offices, Central/State Government undertakings or other entities.

3. Directorate General of Information and Public Relations will give wide publicity of this notification through print and electronic media.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. KADAM-PATIL,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR.

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING. STATIONERY AND PUBLICATIONS.

21-A. NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE

No. PHD-1024/C.R.33/Japuk (XXIX)

General Administration Department

Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road,

Dated 3rd April 2024.

Mantralaya, Mumbai 400 032.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.
For the Lok Sabha General Election-2024 regarding giving leave to voters in Lok Sabha constituencies to vote on polling day.

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्र. लोसानि-२०२४/प्र.क्र.२६/उद्योग-६,

मंत्रालय, मुंबई-३२

दिनांक : २२ मार्च, २०२४.

संदर्भ :- १. भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ECI/PN/२३/२०२४, दि.१६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिद्धीपत्रक. २. भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४ दि.१६ मार्च, २०२४ रोजीचे पत्र.

शासन परिपत्रक

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

२. भारत निवडणूक आयोगाने दि. १६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान राज्यात दि.१९ एप्रिल, २०२४, दि.२६ एप्रिल, २०२४, दि.०७ मे, २०२४, दि.१३ मे, २०२३ व दि.२० मे, २०२४ अशा पाच ५ टप्प्यात होणार आहे.

३. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये परिशिष्ट-१ प्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-

(1) निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

(II) सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील.

(III) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

(IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.

३. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक क्रमांक ECI/PN/२३/२०२४, दि.१६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकास आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४ दि.१६ मार्च, २०२४ रोजीचे पत्र यांस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक क्रमांकः लोसानि-२०२४/प्र.क्र.२६/उद्योग-६,

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या


  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३२२१७१०३६२८१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

SHAMKANT SURESH SONAWANE

(शामकांत सोनवणे) कार्यासन अधिकारी, 
महाराष्ट्र शासन.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon