Regarding the grant of one increment in salary fixation to graduate primary teachers in Zilla Parishad primary schools after being promoted to the post of graduate primary headmaster or center/cluster head
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई
क्रमांकः जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४
दिनांक:- १२.१२.२०२४
स्मरणपत्र-४
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, (ठाणे, रागयड, सातारा, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार, उस्मानाबाद, जालना, नांदेड, लातूर, परभणी, बीड, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला)
विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र, दि.१४.०५.२०२४, दि.०९.१०.२०२४ व दि. २२.११.२०२४ चे स्मरणपत्र
महोदय,
उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.
२. सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र.११४५२/२०२४ दाखल केली आहे. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे.
३. तरी पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये शुक्रवार दि.२९.११.२०२४ पर्यंत शासनास तात्काळ सादर करावी, ही विनंती.
आपली,
(दिपाली पवार) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,
मुंबई
क्रमांकः जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४
दिनांक:- ०९.१०.२०२४
स्मरणपत्र-२
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व) (पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, भंडारा, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलडाणा वगळून)
विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र व दि.१४.०५.२०२४ चे स्मरणपत्र
महोदय, उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.
२. सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय आहे अगर दि.२६. सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून देय आहे, याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शनाकरीता पत्रव्यवहार प्राप्त होत आहे. त्यानुषंगाने सदरहू पदांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने त्याकरीता शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती आवश्यक आहे. सदरहू माहिती आपल्या कार्यालयाकडून विहीत कालावधीत प्राप्त होत नसल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत
आहे. ३. तथापि, ब-याच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येत आहे. तरी ज्या जिल्हा परिषद कार्यालयांकडून यापूर्वीच वेतनवाढ लागू केली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शुक्रवार दि.१८.१०.२०२४ पर्यंत शासनास सादर करावी,
ही विनंती.
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
Increment to ZP Promoted Graduate Teachers HM CH Circular
Increment Graduate Headmaster clusters Head
With regard to Pay Fixseshan / fixing the salary and giving increment to the graduated primary teachers in primary schools in the Zilla Parishad after being promoted to the post of graduate primary principal or clusters / center head.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग,
बाधकाम भवन २५ मर्झबान पथ, फोर्ट,
मुंबई ४००००१
ईमेल:- rdd.est4-mh/a-mah.gov.in
दूरध्वनी : ०२२-२२०६०४४२
क्रमांक जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४
प्रति,
दिनांक :-२०.०३.२०२४
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, (सर्व).
विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना,पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोव्रती दिल्यानंतर येत्तन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :-१. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४. दि.२६.०९.२०२३
महोदय,
उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे
२. उपरोक्त शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.३ मध्ये "सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू राहील" ऐवजी "सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ई-मेल द्वारे शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, ही विनंती.
👇👇👇👇👇👇
🙋 हेही वाचाल
विवरणपत्र
संवर्ग
मंजूर पदे
कार्यरत पदे
सेवानिवृत्त
जिल्हा परिषदः-
पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून वेतनवाढ मिळाल्यास वार्षिक वाढीव आर्थिक भार (रुपये)
पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक
केंद्रप्रमुख
आपली,
(दिपाली पवार )
कक्ष अधिकारी,
महाराष्ट्र शासन
प्रत : कार्यासन आस्था-४ संग्रहार्थ.
👇👇👇👇👇👇
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय खालील प्रमाणे आहे आपण तो डाउनलोड करू शकता 👇
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतत
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकःजिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दिनांक:- २६ सप्टेंबर, २०२३
वाचा :-
१) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय पीआरई-१०९४/७०४/(एक)/प्राशि-१दिनांक १४-११-१९९४
२) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक पीआरई-१०९५/७८७/प्राशि-१ दिनांक १०-११-१९९५
३) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक पीआरई-१०९९/ (२२८३)/प्राशि-१ दिनांक १३-०८-१९९९
४) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक पीआरई-१०९३/ (१५२)/प्राशि-१ दिनांक १३-११-२००३
५) महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ यांची पत्रे दिनांक २२-०१-२०२०, ८-१०-२०२०, २२-
१२-२०२०
प्रस्तावना :-
पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर, काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१, नियम ११ (१) (अ) नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा/विधान परिषद यांच्या पत्रान्वये शासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत सर्व समावेशक सुचना देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता.
पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठता/गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८ नोव्हेंबर, १९८८ च्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ अन्वये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
पदवीधर प्राथमिक शिक्षक हा त्यास संबंधित शाळेत नेमूण दिलेल्या विषयाच्या अध्यापनापुरता मर्यादित असतो. तो इयत्ता ६ ते ८ मधील विशिष्ट विषयांचे अध्यापनाचे कामापुरता मर्यादित असतो. परंत पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून त्यांना दरआठवडयात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक आहे व उवर्रित कालावधी त्याला संबंधित शाळेचे प्रशासन व संनियत्रण हाताळावे लागते. तसेच केंद्रप्रमुखास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहीक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे पदवीधर पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखाचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास केंद्रप्रमुख अथवा पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) खालीलप्रमाणे तरतूदीस अनुसरुन पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
१. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) खालीलप्रमाणे तरतूद आहे.
" नियम११ (१) नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि
(ए) वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करित असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समयश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे, खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर, आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढीइतकी रक्कम मिळाल्यावर, जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. "
२. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी.
३. सदर शासन निर्णय, शासन निर्णय प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३२५/२३/सेवा-३ दिनांक ०८-०८- २३ अन्वये प्राप्त मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
👇👇👇👇👇
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९२६१६४४३१८३२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
POPAT DATTATRAYA DESHMUKH
(पो.द. देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon