DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shala Mahavidyalayat Matdar Din Rabvine Circular

Shala Mahavidyalayat Matdar Din Rabvine Circular 

राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञा

सर्वप्रथम खालील मार्गदर्शक व्हिडिओ पहा
आता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा 

        ⏬

👍👍👍👍👍👍👍
5555
दि. २५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०५/एसडी-६, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दि. २३ जानेवारी, २०२४.
वाचा:-
१. शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१२७/एसडी-६, दि.२७.०९.२०२१
२. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.७४५/२३/३३, दिनांक १९ जानेवारी, २०२४.
परिपत्रक
दि.२५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते.
२. या पार्श्वभूमीवर सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये (इयत्ता नववी आणि दहावी) आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात यावा. सदर दिवशी पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेः
अ) संदर्भ क्र.१ येथील परिपत्रकानुसार शाळेत (इयत्ता नववी व दहावी) आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळ या व्यासपीठांतर्गत सदर दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात याव्यात : निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, भित्तिपत्रक (पोस्टर), रील (एक मिनिटांचे व्हिडिओ), मीम, गाणे, विडंबन काव्य, घोषवाक्य इ. स्पर्धा. (मताधिकार, लोकशाही या संबंधीच्या सर्वसमावेशक स्पर्धांच्या विषयांची यादी सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ मध्ये देण्यात आली आहे.)
ब) मताधिकार, लोकशाही यासंबंधी परिसंवाद, व्याख्यान यांचे आयोजन करावे. क) विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा. (मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शपथेचा नमुना सोबत जोडलेल्या परिशिष्ट २ मध्ये देण्यात आलेला आहे.)
३ उपरोल्लिखित उपक्रमांशिवाय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना निवडणूका / मतदानाचे महत्व / मतदार नोंदणी इत्यादी विषयक इतर नवनवीन उपक्रम राबवून देखील राष्ट्रीय मतदार दिन साजरा करता येईल.

४ सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 
👇👇👇👇👇👇


 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०१२३१६१९२०२५२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

SHARAD SHRIPATRAO MAKNE


(शरद माकणे)
 कार्यासन अधिकारी, 
महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०५/एसडी-६, दि.२३.०१.२०२४ सोबतचे

परिशिष्ट १

स्पर्धांसाठी विषयांची यादी पुढे देण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याव्यतिरिक्त इतरही स्पर्धा मताधिकार, लोकशाही यांसंबंधी विषय देऊन घेता येतील. यांतील काही स्पर्धा राष्ट्रीय मतदार दिनाच्या आधी घेऊन सदर दिवशी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात यावीत. तसेच, रांगोळी, भित्तिपत्रक या स्पर्धांचे आयोजन सदर दिवशीही करता येईल, जेणेकरून वातावरणनिर्मिती होईल.

स्पर्धांसाठी विविध विषयांची यादी पुढीलप्रमाणे :

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी

वर्गप्रमुख पदाची निवडणूक मी अशी लढवणार...

माझा नगरसेवक/सरपंच असा हवा

मी नगरसेवक/सरपंच झालो / झाले तर...

मी आमदार झालो / झाले तर...

माझा आमदार असा हवा...

मी खासदार झालो / झाले तर...

माझा खासदार असा हवा

एका बोटावरच्या शाईची किंमत?

मी मताधिकार बजावणार कारण...

अठराव्या वर्षाची जबाबदारी

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०५/एसडी-६, दि.२३.०१.२०२४ सोबतचे

परिशिष्ट २

राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञा

मराठी

"आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु."

हिंदी

"हम, भारत के नागरिक, लोकतंत्र मे. अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते हैं की हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओंकी मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर, धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनो में अपने मताधिकार का प्रयोग करेंगे."

English

"We, the citizens of India, having abiding faith in democracy, hereby pledge to uphold the democratic traditions of our country and the dignity of free, fair and peaceful elections, and to vote in every election fearlessly and without being influenced by considerations of religion, race, caste, Community language or any inducement."

Take Voters Pledge and Get Free Certificate

खालील दिलेल्या लिंकला स्पर्श केल्या नंतर असा विंडो उघडेल 
                                  ⏬

त्यानंतर तुमची भाषा निवडा नंतर असा विंडो उघडेल 
                                  ⏬



त्यानंतर तुमच्या समोरअसा विंडो उघडेल वाचा शपथ घ्या  चौकोनात ✔असा चेक मार्क  लावा 
                                  ⏬


त्यानंतर चौकोनात ✔असा चेक मार्क  लावा आणि Submit वर टिचकी मारा / करा 
                                  ⏬


त्यानंतर असे डिजिटल प्रमाणपत्र येईल डाउनलोड करा आणि समज माध्यमावर शेअर करा


आता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा 

        ⏬

👍👍👍👍👍👍👍

आशा लिंक प्राप्त करण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा आणि फॉलो करा 
FOLLOW WEBSITE
लिंक / LINK 
⏫⏫⏫⏫⏫⏫⏫

त्यासाठी पुढील अध्यायात माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन दाबा म्हणजेच पुढील सूचना तुम्हाला प्राप्त होतील

Next Update

FOLLOW WEBSITE

CLICK HERE 

▶️ SUBSCRIBE

CLICK HERE 

For Google News -

CLICK HERE 

🥏 Join Our Social Media Group 

CLICK HERE 

©️®️

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon