DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Ration Card Download Add New Name Online

Ration Card Download Add New Name Online

रेशनकार्डवर मुलाचे नाव कसे जोडाल जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया.

    रेशन कार्ड हे एक वैध भारतीय ओळखपत्र आणि रहिवासी दाखला आहे. रेशन कार्डचा उपयोग बँकेत अकाउंट सुरू करणे, पासपोर्ट आणि अन्य सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो, याशिवाय रेशनकार्ड धारक सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसं की साखर, गहू, रॉकेल, तेल, तांदूळ यासारख्या पदार्थांवर सूट मिळते. गरीब आणि आर्थिक परिस्थीती कमी असलेल्या लोकांना अन्न मिळावे याची दखल घेतली जाते. 
अन्य सरकारी योजनांचा लाभ
    काही सरकारी योजना जसं की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) ही फक्त रेशनकार्ड धारकांसाठीच उपलब्ध आहे. रेशन कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
1. आधारकार्ड
2. निवासप्रमाण पत्र
3. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र
४. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र
५. उत्पन्नाचे प्रमाणपत्र

     रेशन कार्डची वैधता साधारणतः पाच  वर्षांपर्यंत असते. त्यानंतर राज्य अन्न प्रशासनाला अर्ज करावा लागतो. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीये. तर, तुम्ही राज्याच्या अन्न विभागाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या अन्न आणि सुरक्षा विभागाच्या केंद्रात जाऊनही अर्ज करु शकतात. 
मुलांची नावे रेशन कार्डमध्ये दाखल करण्याची ऑनलाइन प्रक्रिया खालीलप्रमाणे
● सुरुवातीला अन्न सुरक्षा विभागाच्या वेबसाइटवर जा


किंवा


● रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एका सदस्याचे नाव जोडण्यासाठी त्या पर्यायावर क्लिक करा
● लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा
● फॉर्ममध्ये गरजेची माहिती भरा, तुमचं नाव आणि रेशन कार्ड नंबर, मुलाचे नाव, जन्म तिथी, निवासप्रमाण पत्र संख्या आणि आधार कार्ड संख्या
● तुमच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
● त्यानंतर अर्जाची फी भरा
● अर्ज सबमिट करा
अर्ज जमा केल्यानंतर एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. या नोंदणी क्रमांकामुळं तुम्ही रेशनकार्डची सध्याची स्थिती पाहू शकात.
रेशनकार्डवर मुलाचे नाव टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. रेशन कार्ड
2. मुलाचे जन्म प्रमाणपत्र
3. कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
3. तुम्ही यापैकी कोणत्याही एका कागदपत्राशिवाय अर्ज केल्यास, अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon