DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Prajasttak Din Smarambha Paripatrak

भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन समारंभ - २६ जानेवारी, २०२४.

महाराष्ट्र शासन शासन परिपत्रक क्र.सीईआर-२०२३/प्र.क्र.३२२/राशि-१,
सामान्य प्रशासन विभाग,
राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक :- २३ जानेवारी, २०२४
शासन परिपत्रक :-
दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०-०० वा. च्या नंतर करावा.
२. मा. राज्यपाल हे सकाळी मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.
३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री/ मंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील:-



४. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तथापि, राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.
५. राष्ट्रध्वजाला वंदन करताना "राष्ट्रगीत" म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.
६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी- १०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.
७. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी
८. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित रहाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.
९. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.
१०. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.
११. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे :- वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय स्तरावर
वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.
१२. काही ठराविक जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात:-
अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.
ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये.
क) मा. पालकमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावे.
१३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 
👇👇👇👇👇👇👇
स्पर्श करा 
 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०१२३१५४२२५८२०७ आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
RAMCHANDRA KONDIBA DHANAWA
(रा.कों. धनावडे) सह सचिव, महाराष्ट्र शासन


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon