DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Payment of Family Pension To Dvyang Children GR

 Payment of Family Pension To Dvyang Children

विकलांग मुलांना कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्यासंबंधात कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.

 महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग, शासन निर्णय,

क्रमांक कुनिये - 1095/45/सेवा - 4, मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 26 एप्रिल, 1995.

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- कुनिये- 1090 / 254/सेवा - 4, दिनांक 2 जुलै 1991 अन्वये हयातभर कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्यासाठी शासकीय कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीपूर्वी किंवा तेवत असताना झालेल्या मृत्युपूर्वी उघडकीस आलेली अपत्यांची विकलांगता विचारात घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. अशा प्रकरणी कुटुंब निवृत्तिवेतनाचे त्वरीत प्रदान केले जाये यासाठी खालील कार्यपध्दती विहीत करण्यात येत आहे :

जेथे अपत्य सेवानिवृत्तिनंतरचे आहे किंवा सेवानिवृत्तिनंतर अपत्यामध्ये विकलांगता निर्माण झाली आहे, अशा विविध कारणांमुळे निवृत्तिवेतन प्रदान आदेशांमध्ये पात्र अपत्यांची नावे नमूद करण्यात आली नसतील तर निवृत्तिवेतनधारकं, त्याची तशी इच्छा असल्यास, पात्र अपत्यांची यादी, त्यात एखादे अपत्य विकलांग आहे किंया नाही ते दर्शवून निवृत्तिवेतन प्राधिकृत करणा-या अधिका-यांकडे (म्हणजेच ययात्यिती महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर) सादर करू शकेल. निवृत्तिवेतन प्राधिकृत करेगा वा अधिका-यांनी पात्र अपत्याची माहिती अभिलेख्यांमध्ये नमूद करून यादी प्रान्त झाल्याची पोच पावती द्यावी. ही पोच पाचती निवृत्तिवेतनधारकांच्या कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षित ठेवावी, जेणेकरून कुटुंब निवृत्तिवेतनाची मागणी करतेवेळी तो निवृत्तिवेतन प्राधिकृत करणा-या अधिका-याकडे सादर करता येईल. मानसिकदृष्ट्या विकलांग किंवा अज्ञान अपत्ये की जी पालकाच्यामार्फत निवृत्तिवेतन प्राप्त करणार आहेत, त्यांचे प्रकरणी पोच पावती सादर करण्याची जवावंदारी पालकाची राहील. तथापि पोच पावती सादर करणे, ही कुटुंब निवृत्तिवेतनाच्या मागणीवर कारवाई करण्यासाठी पूर्वअट असणार नाही.

या आदेशांची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

नहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

 

Payment of family pension" to handicapped children- Procedure for

GOVERNMENT OF MAHARASHTRA

 Finance Department, Resolutior No.PEN-1095/45/SER-4, Mantralaya, Bombay-400032, Dated the 26th April 1995.

RESOLUTION

By Government Resolution, Finance Department, No.PEN-1090/ 254/SER-4, dated the 2nd July 1991, the condition of manifestation of the disability of children before retirement or death in harness of the Government servant for grant of family pension for life has been dispensed with. In order to expedite sanction of family pension in such cases, the following procedure is prescribed:-

Where the names of eligible children have not been mentioned in the Pension Payment Order for various reasons like the child is a post-retiral one or post-retiral manifestation of disability of the child, the pensioner, if he so desires can furnish a list of eligible children to the pension authorising authority (i.e. The Accountant General (A&E), Maharashtra, Bombay/Nagpur as the case may be) interalia indicating whether any child is handicapped or not. The receipt of this list may be acknowledged by the pension authorising authority, mentioning the details of the eligible children taken on record. This acknowledgement my be preserved by the members of the family of the pensioner for production at the time of submission of claia for family pension in their own turn to the pension authorising authority. In case of mentally retarded. children or minor who whould draw pension through a guardian, the responsibility of producing this acknowledgement devolve on the guardian. The production of acknowledgement will, however, not be pre-condition the processing of claims for family pension. to

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V.W.Chaudhari,

Under Secretary to Government.

If you want PDF copy of this circular just touch this line

या परिपत्रकाची पीडीफ प्रत हवी असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon