PSLM NIEPA MIEPA Program For All Teacher
शालेय
नेतृत्व विकास व व्यवस्थापन हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक, माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक / पर्यवेक्षक / ज्येष्ठ शिक्षक यांच्यासाठी हा
कार्यक्रम ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. |
School
Leadership Development and Management Program is made available online free
of charge for Primary, Secondary and Higher Secondary
Principals/Supervisors/Senior Teachers across the country. |
विषय
: शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) कोर्सची संबंधितांपर्यंत पोहचविणेबाबत. |
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय
शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत
असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर ( NCSL) मार्फत
तयार केलेल्या व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व
विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) औपचारिक सुरुवात
दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी झालेली
होती. हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक मुख्याध्यापक / पर्यवेक्षक / ज्येष्ठ शिक्षक यांच्यासाठी हा कार्यक्रम
ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यभरातून सदर
कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. |
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व
प्रशिक्षण संस्था ( निपा), नवी दिल्ली यांचेकडून आयोजित महाराष्ट्रातील मुख्याध्यापक / पर्यवेक्षक /
ज्येष्ठ शिक्षकांनी या कोर्सला नोंदणी करून कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. शालेय
नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षणस्तरावरील मुख्याध्यापक / पर्यवेक्षक / ज्येष्ठ शिक्षक यांना या
कार्यक्रमाचा लाभ व्हावा यासाठी नोंदणी करून कोर्स पूर्ण करावा शालेयनेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमा बद्दल अधिक जाणून घ्या |
शालेय
नेतृत्व व व्यवस्थापन (Program
on School Leadership and Management PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी
दिल्ली अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी, हिंदी व
इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या
वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे
आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा |
Program
for School Leadership and Management PSLM नोंदणी
करण्यासाठी वेबपोर्टल लिंक - Web Portal link to register – CLICK
HERE |
शालेय
नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमा बद्दल अधिक जाणून घ्या
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon