








'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. शाहीर साबळेंच्या बुलंद आवाजातील हे गीत ऐकलं की प्रत्येक मराठी माणसाची आणि महाराष्ट्राभिमान्यांची छाती गर्वाने फुलून येते. महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या तमाम जनतेकडून महाराष्ट्र सरकारला धन्यवाद
राज्यातील तरुणाईसह सर्वच नागरिकांना स्फूर्तिदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तिगीत राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला.राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर झाली. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon